आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आम्ही नेहरुं, गांधींना मानतो, तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका', संजय राऊतांचा काँग्रेसला घरचा आहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर माफी मागण्यास नकार

मुंबई- 'मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही', असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप उत्तर देताना म्हटले. पण, आता शिवसेनेनं राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन आक्रमक भूमिका मांडली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत काँग्रेसला टोला लगवला. 'आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे', असे ट्वीट त्यांनी केले.

संजय राऊतांनी ट्वीट करत सावरकरांबद्दल आपली भूमिका मांडली आहे. "आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे", अशा शब्दात थेट संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला. तसेच, "वीर सावरकर महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी  यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला", असे ट्वीटमधून राऊत म्हणाले.   

बातम्या आणखी आहेत...