ज्ञान / भगवान शंकराच्या रहस्यमयी रुपातून आपण आयुष्य कसे जगावे हे शिकू शकतो

भगवान महादेव जितके रहस्यमयी आहे तितकेच त्यांची वेश-भूषा आणि तिच्याशी जोडलेले तथ्य देखील विचित्र आहेत
 

दिव्य मराठी वेब

Jul 28,2019 03:21:00 PM IST

जीवन मंत्र डेस्क - भगवान महादेव जितके रहस्यमयी आहेत तितकेच त्यांची वेश-भूषा आणि त्याच्याशी जोडलेले तथ्य देखील विचित्र आहेत. शंकर स्मशानात निवास करतात तसेच त्यांच्या गळ्यात नाग धारण करतात. भांग आणि धतूऱ्याचे सेवन करतात. शिव पर्वात अर्थात श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पूजेला खूप महत्व आहे. हिंदू पंचांगाचा हा महिना शंकराच्या जवळ जाण्यास मदत करतो. यापार्श्वभूमीवर शंकराशी निगडीत काही गोष्टी जाणून घेऊयात.


1. पॉवर ऑफ युनिटी

शंकराने ज्याप्रकारे आपल्या केसात गंगेला धारण केले आहे त्यावरून एकजुटीचा संदेश मिळतो. महादेवाने विखुरलेल्या केसांना एकत्र करून गंगेच्या विक्राळ रुपाला शांत स्वरूपात परिवर्तित केले आहे.


2. ब्रॉड व्हिजन
शंकर त्रिनेत्र आहेत. दुरगामी परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त बाहेरील दृष्टीचा प्रयोग न करता, विचार-विनिमय करून निर्णय घ्यायला हवा असे महादेवाचा तिसरा डोळा आपल्याला सांगतो. सदैव दुरगामी परिस्थितिंवर आपली नजर असावी.


3. पेशंस
शिव हे शशि शेखर आहेत. त्यांनी आपल्या मस्तकावर चंद्राला धारण केले आहे. चंद्राला शीतलता आणि शांतीचे प्रतिक मानले जाते. अशात कोणत्याही परिस्थितीत आपण आपला संयम सोडू नये आणि मनावरील नियंत्रण कायम ठेवावे अशी शिकवण महादेवांकडून मिळते.


4. एक्सप्रेशन
निळकंठ हे देखील महादेवाचे एक रुप आहे. हे रुप आपल्याला क्रोध सहन करण्याची शिकवण देते. क्रोध नेहमीच बुद्धीला भ्रमित करून स्वतः आणि इतरांना अडचणीत टाकत असल्याचे मानले जाते. अशात क्रोधावर आपल्या संयमाने त्याला पराजित करावे.


5. पर्यावरणवादी
भोलेनाथ आपल्या गळ्यात सापाला गुंडाळून ठेवतात आणि नंदी त्यांचे वाहन आहे. ते पर्वतावर निवास करतात आणि कंदमुळे खातात. महादेवाच्या भक्तांमध्ये अनेक पशु-पक्षी, देव दानव यांचा समावेश आहे. त्यांचे हे स्वरूप पर्यावरणाप्रति प्रेम दर्शवते.


6. फँटसी
भोलेनाथ कपर्दी आणि कपाली (जटा आणि कपाल धारण करणारे) देखील आहेत. ते आपल्या शरीरावर विभूती धारण करतात. जे सांगतात की, परिपूर्ण असूनही स्वत:ला गोंधळात टाकू नका. आयुष्यात उत्कटता आणि वचनबद्धता ठेवा, परंतु कल्पनेच्या विश्वात जगू नका.

X
COMMENT