आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बातमीला शीर्षक देण्याची आमच्यात हिंमत नाही... ही बातमी नव्हे, बातम्यांचा कलंक आहे..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : संपूर्ण मानवजातीला लज्जित करणारी आणि कधी कल्पनाही करू शकत नाही अशी अत्यंत वाईट घटना बुधवारी पोलिसांच्या दप्तरी नोंदली गेली. दारूच्या आहारी गेलेल्या एका २० वर्षीय नरपशूने आपल्या सख्ख्या आईलाच वासनेची शिकार केले. गेले तीन महिने तो हे हीन कृत्य करीत होता. कुणाला सांगितले तर मारून टाकण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकीही देत होता. अखेर मंगळवारी झालेल्या अत्याचारानंतर या पीडित मातेने औरंगाबाद सिडको पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणाची फिर्याद नोंदवली.

सात वर्षांपूर्वी पतीचे निधन झालेल्या या महिलेने चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नाेकरी करीत आपल्या चार अपत्यांना वाढवले. दोन मुली आणि दोन मुले. दाेन्ही मुली बाहेरगावी असतात. मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे तर दुसरी मुंबईत नोकरी करते. मुलांमध्ये हा नरपशू मोठा. कामधंदा आणि शिक्षणही न करता दारूच्या आहारी गेलेला हा तरुण दीर्घकाळापासून दारूसाठी पैसे द्यावेत म्हणून आईला मारहाण करीत होता. बहीण घरी आली तर तिलाही पैशांसाठी मारहाण आणि शिवीगाळ करीत होता.

गेल्या तीन महिन्यांपासून तर त्याने आपल्या आईलाच वासनेची शिकार केले आहे. पण भीती आणि आपलीच बदनामी होईल या चिंतेने ती तो अत्याचार सहन करीत आली. मंगळवारी दुपारीही त्याने घरात एकटी असलेल्या आईवर मारहाण करीत आणि धमक्या देत अत्याचार केले. त्यानंतर मात्र तिने हिंमत करून बुधवारी सकाळी आठ वाजताच पोलिस ठाणे गाठले आणि आपल्या मुलावर कारवाई करावी, अशी विनवणी करीत फिर्याद नोंदवली. सिडको पोलिसांनी या नरपशूला तातडीने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली आहे.