आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • "We Have Alliance With Asaduddin Owaisi, Not MIM Leaders In Maharashtra" Prakash Ambedkar

"आमची युती असदुद्दीन ओवेसींसोबत झाली आहे, एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी नाही"- प्रकाश आंबेडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नुकतंच एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला राम-राम करत स्वबळाचा नारा दिला. पण, त्यानंतरही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आघाडीबाबत आशावादी असल्याचे दिसत आहेत. 'आमची युती एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी झाली नसून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी झाल्याचे' मत आंबेडकरांनी व्यक्त केले आहे. यातून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील एमआयएम नेत्यांच्या मताला किंमत नसल्याचे दाखवून दिले.

आंबडेकर म्हणाले, "आमची युती एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी झालेली नाही. आमची युती एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता ओवेसींकडे निरोप घेऊन गेले आहेत. ओवेसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आमची युती कायम आहे."दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी युती तोडण्याचा निर्णय ओवेसी यांच्या सुचनेप्रमाणेच घेतल्याचे स्पष्ट केले आहे. जलील म्हणाले, "आम्हाला खूपच कमी जागा दिल्या जात होत्या. आम्ही बराच काळ वाट पाहिली. वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिला, मात्र आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाही. त्यामुळे अखेर आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला."


"असदुद्दीन ओवेसी यांना युतीबाबत मेल करण्यात आला होता. तो मेल मिळाल्यानंतर त्यांनी युतीबाबत काय भूमिका घ्याची याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर आम्ही तातडीने प्रसिद्धीपत्रक काढून आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका आहे. कोणाला मान्य करायची असेल तर करावी नसेल करायची तर करू नये."

"मी पक्षाचा लहान कार्यकर्ता असलो, तरी मी पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. माझ्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर मी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता किती जागा लढवायच्या, पुन्हा आघाडी करायची की नाही करायची? याचा अंतिम निर्णय ओवेसीच घेतील", असे मत जलील यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...