आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आमचं खातेवाटप आधीच ठरलंय ; गृहमंत्रिपद अनेकांना नकाेय' : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर : खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पूर्णविराम दिला. 'आमच्या पक्षात काेणीही नाराज नाही. खातेवाटपही आठ दिवसांपूर्वीच ठरले आहे. मात्र गृहमंत्रिपद नको म्हणणारेच जास्त आहेत', असे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला आजवर मंत्रिपद मिळाले नाही, याचा विचार करूनच राहुरीला मंत्रिपद दिल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पवार गुरुवारी नगरला आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, 'खातेवाटपावरून आमच्या पक्षात काेणतीही नाराजी नाही. गृहखाते आम्हीच अनेकांना देत होतो, पण आमच्याकडे अनेकजण नको म्हणत होते. एका पक्षाचे सरकार असताना शपथविधी झाल्यानंतर दोन दिवस खातेवाटप होत नव्हते. आता तर राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे,' असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.

आघाडी पॅटर्न इतर राज्यातही राबवणार ?

महाविकास आघाडी पॅटर्न इतर राज्यांतही राबवला जाणार का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, 'याबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र, याबाबत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट आले आहे. ममता बॅनर्जी यांचाही संपर्क झाला आहे. आगामी काळात याबाबत विचार होऊ शकतो.'
 

बातम्या आणखी आहेत...