political / आमच्याकडे १०० ग्रॅम व पाव किलाेचे अणुबाॅम्ब : पाक मंत्री 

पाकिस्तानकडे निम्मा पाव अथवा पावभर इतकीसुद्धा अण्वस्त्रे आहेत

वृत्तसंस्था

Sep 04,2019 10:59:00 AM IST

इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्दयावर एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताच विजेचा धक्का खाणारे पाकिस्तानचे वादग्रस्त रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी एक हास्यास्पद विधान केले आहे. पाकिस्तानकडे निम्मा पाव अथवा पावभर इतकीसुद्धा अण्वस्त्रे आहेत, हे भारताने लक्षात घ्यावे, असे म्हटले. पाकिस्तानी माध्यमात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार शिखांचे प्रमुख धार्मिक शहर ननकाना साहेब येथे बांधकाम होत असलेल्या रेल्वे भवनाची त्यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना रशीद म्हणाले, पाकिस्तानकडे सव्वाशे ग्रॅम, २५० ग्रॅम वजनाचेही अण्वस्त्रे आहेत. त्यांचा एखाद्या लक्ष्यावर मारा करता येतो. पाकिस्तानला अणूयुद्ध नको आहे. परंतु युद्ध लादलेच तर पाकिस्तान यास चोख प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी सांगितले. आम्हाला युद्ध नको आहे, पण पाकवर हल्ला झालाच आमच्याशी भारताचे शेवटचे युद्ध असेल, असे ते म्हणाले.

X
COMMENT