आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : जेव्हा टेनिसपटूंनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या डेव्हिस कपदरम्यान सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. तेव्हा फेडरेशन व सरकारने आम्हाला एकटे सोडले होते. जर भारताची क्रिकेट टीम जाणार असेल, तर आमदार, खासदार संसदेत उभे राहतात व त्यावर काहीना काही बोलतात, असे माजी डेव्हिस कप कर्णधार महेश भूपतीने म्हटले.
आतापर्यंत ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने (एआयटीए) त्याला कर्णधारपदावरून बाजूला केल्याने, त्या निराशेतून तो अद्याप बाहेर आला नाही, असेही म्हटले. आयटीए गेल्या दोन दशकांपासून खेळाडूंशी असा व्यवहार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा प्रकारच्या निर्णायामुळे आश्चर्य वाटले नाही. भारत व पाकिस्तान यांच्यात डेव्हिस कप सामना पहिले इस्लामाबादमध्ये होणार होता. मात्र, खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता होती. आयटीएफच्या विनंतीनंतर आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) हा सामना नूर सुलतान (कजाकस्तान) येथे ठेवला.
भूपतीने म्हटले की, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे गेल्या दोन दशकापासून कोणत्याही खेळाच्या संघाने तेथे दौरा केला नाही आणि अचानक भारतीय संघाला तेथे जा असे कसे म्हणतात. त्या निर्णयावर प्रत्येक खेळाडूने टिका केली, हे चुकीचे आहे.' ४५ वर्षीय भूपतीने सुरक्षेमुळे पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. त्यानंतर भूपतीला भारतीय डेव्हिस कप टीमच्या कर्णधार पदावरून काढले. त्याने म्हटले, एआयटीने माझ्या सोबत जे वर्तन केले, त्यामुळे मी निराश झालो. ते मला कर्णधार बनवणार होते, तेव्हा मला भेटण्यासाठी ते हैदराबादपर्यंत आले. मला कर्णधारपदावरून दूर करण्यात अडचण नाही, मात्र शिष्टाचारानुसार एखादा संदेश तरी द्यायला हवा होता.
पाकिस्तानमध्ये जाणे सुरक्षित नाही, असे सरकारमधील कोणी म्हटले असते, तरी काम झाले असते. मात्र, कोणीही बोलण्यास तयार नव्हते. हा मुद्दा क्रिकेटबाबत असता, तर प्रकरण वेगळे ठरले असते. आमचे म्हणणे कोण ऐकणार. भारतीय टीमला पाकिस्तानला जगात कोठेही हरवण्यास कठीण नाही. आम्ही त्यांना कोठेही हरवू.
आज सामना; ५७ वर्षांत ६ सामने भारताने जिंकले
नूर सुलतान : भारत व पाकिस्तान यांच्यात डेव्हिस कप शुक्रवारपासून खेळवला जाईल. दोन्ही संघांत आतापर्यंत ६ सामने झाले. सर्व भारताने जिंकले. पहिल्या दिवशी शुक्रवारी दोन एकेरी व दुसऱ्या दिवशी दुहेरी आणि उलटे सामने होतील. एकेरीत रामनाथचा सामना शोएब व सुमित नागलचा सामना हुजैफा रहमानशी होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.