सत्ता संघर्ष / 'आम्हाला 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे, मुख्यमंत्री पद मिळणार असेल तरच चर्चा करू'- संजय राऊत

लवकर सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती शासन लागू होईल- मुनगंटीवार

दिव्य मराठी वेब टीम

Nov 03,2019 02:17:00 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेनेत अजूनही रस्सीखेच सुरुच आहे. आज शिवसेना प्रवक्ते संजय राउत यांनी एक मोठे विधान करुन सर्वांनाच चकित केले आहे. ते म्हणाले की, आम्हाला 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. अद्याप सरकार स्थापनेबाबत आमची भाजपसोबत काहीच चर्चा झाली नाहीये. मुख्यमंत्री पदावर सहमति मिळाल्यावरच चर्चा होईल. असे पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले.


पुढे ते म्हणाले की, "सेनेकडे 170 पेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, यात काही शंका नाहीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेना मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतिर्थावर शपथ घेईल. उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले असून, लवकरच गणित माध्यमांसमोर मांडण्यात येईल." असे संजय राऊत म्हणाले.


‘राष्ट्रपती शासन लागू झाल्यास, हा भाजपचा पराभव असेल’

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील साप्ताहिक कॉलममध्ये संजय राउतांनी सरकार स्थापनेची तुलना ‘अहंकाराच्या चिखलात अडकलेला रथ’ अशी केली आहे. तसेच, राज्यात जर राष्ट्रपती शासन लागू झाले, तर हा भाजपचा आतापर्यंतचा सर्वात मोभा पराभव असेल, असेही राऊत म्हणाले.

X
COMMENT