• Home
  • News
  • 'We lost family and gone bankrupt in 26/11 attacks' : Ashish Choudhury

बॉण्डिंग / '26/11च्या हल्ल्यात कुटुंब गमावले आणि दिवाळे निघाले तरीही आमचे नाते तुटले नाही' : आशिष चौधरी

व्हॅलेन्टाईननिमित्त पाहुयात सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरविषयी काय सांगतात 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 12:26:48 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : व्हॅलेन्टाईन डेनिमित्त सर्वच जोडपी आज आनंदसाजरा करत असतात. प्रत्येक जण आपापली लव्ह स्टोरी जगासमोर मांडण्यास उत्सुक असतो. पण यातील प्रत्येकाचीच लव्ह स्टोरी गोड गोड नसते. कधीतरी कुणाला संघर्षातही प्रेम फुलवावे लागते. अशाच एका जोडीची ही स्टोरी खास तुमच्यासाठी...


अभिनेता आशिष चौधरीने आपल्या आणि आपल्या पत्नीच्या नात्याविषयी सांगितले. तो म्हणाला, "पत्नी समितासाेबत माझे प्रेमाचे, विश्वासाचे आणि लग्नाचे नाते लोकांना फिल्मी वाटू शकते. कारण एखाद्या चित्रपटाला साजेल असेच माझ्या जीवनात घडले. अशा घटनांपासून मी खूप काही शिकलो आहे. आमचे लग्न झाले होत. समिता गरोदर होती. तेव्हाच 26/11 च्या हल्ल्यात माझी बहीण आणि मेहुणा मारले गेले. मी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलो होतो. एक-एक पैशासाठी मी भटकत होतो. तरीदेखील माझी पत्नी माझ्यासोबत डोंगरासारखी उभी राहिली. पैशाच्या तंगीमुळे तिने माझे नाते तोडले नाही. तिने माझ्यावर विश्वास ठेवला. त्यावेळी मी पूर्णपणे खचून गेलो होतो. कुटुंब गमवून बसलाे होतो, दीवालिया घोषित झालो होतो. त्यामुळे मी दारूच्या नशेत बुडालो. तीन ते चार महिन्याचा तो काळ होता. मी शरीराचीही काळजी घेत नव्हतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष देत नव्हतो. फक्त रडत राहायचो. मात्र समिताने हिम्मत सोडली नाही तिने मला धीर दिला.


समिता मला गप्प करण्याचा प्रयत्न करायची मात्र मी तिच्यावर रागावायचो. मात्र तिने ते सहन केले आणि मला समजून सांगितले. तीन महिन्यानंतर मी स्वत:ला सावरले. तोपर्यंत आमच्या जीवनात मुलगा अगस्तय आला होता. त्यानंतर मी स्वत:ला इतके सावरले की, आजपर्यंत कधीच खचलो नाही. आमच्या नात्याची सुरुवात पाहिली तर आम्ही आधी चांगले मित्र होतो... त्यानंतर आमच्यात प्रेम जडले... त्यानंतर लग्नाने आम्हाला जोडून ठेवले. त्यानंतर माझ्या मुलाने आम्हाला आजपर्यंत बांधून ठेवले आहे. तो खऱ्या अर्थाने आमचे नाते टिकवण्यात यशस्वी ठरला. कारण त्याचे निरागस हसू आम्हाला नैराश्यातून दूर काढत होते. त्यानंतर आमच्या घरात जुळ्या मुली आल्या. समिताने जुळ्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर घरात आनंदी आनंद पसरला होता. मी आणि समिताने खूपच चांगल्याप्रकारे हे सर्व हँडल केले. आम्ही एकमेकांना फार पूर्वीपासून ओळखत होतो, त्यामुळे हे सर्व शक्य झाले, असे मला वाटते. लग्न आणि रिलेशनशिपआधी आम्ही चांगले मित्र होतो. आठ वर्षे डेटिंग केले."

X
COMMENT