आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते, मात्र ती धमकी समजली का? - सुधीर मुनगंटीवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  विधानसभा निवडणुकीचा निकाल येऊन आठ दिवस उलटले आहे. जनतेने महायुतीला जनादेश देखील दिला. मात्र सरकार स्थापनेबाबत अद्यापही कोणताही निर्णय होऊ शकला नाही. यादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेत्यांमध्ये वाद विवाद होताना दिसत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असा पुनरुच्चार राऊत करत आहेत. दरम्यान वेळेत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. तर राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत असा पलटवार संजय राऊत यांनी मुनगंटीवारांवर केला होता. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आली आहे. 
 

काय म्हणाले मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "वेळेत सरकारची स्थापना न केल्यास काय होईल असा प्रश्न आम्हाला विचारण्यात आला. यावर घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असे सहज उत्तर आम्ही दिले. जर शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असेल मात्र तो चेतावणी म्हणून घेण्यात आला आहे का?" असा प्रतिसवाल मुनगंटीवार यांनी केला 
 

बातम्या आणखी आहेत...