आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • We Prepare Them For The Big Responsibility By Training Freshers, The Relationship Executive Can Also Be The Leader Of The Company Going Forward.

फ्रेशर्सना प्रशिक्षण देऊन मोठ्या जबाबदारीसाठी आम्ही त्यांना तयार करतो, रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हही पुढे जाऊन कंपनीचा लीडर होऊ शकतो

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • रिस्क डोमेन, सेल्स, ग्राहक सेवा आणि फंड व्यवस्थापनात जास्त संधी; उमेदवारास कम्युनिकेशन स्किलमध्ये सतर्क असणे आवश्यक
 • युनि. एएमसीचे प्रदीपकुमार सांगताहेत म्युच्युअल फंड उद्योगातील संधी

​​​​​​नवी दिल्ली : म्युच्युअल फंडाचा विकास अन्य फंडांच्या तुलनेत कमी झाला होता. मात्र, आता हे सर्वात तेजीने वाढणारे क्षेत्र आहे. नाेकरी व करिअर वृद्धीवरून युनियन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लि.(युनियन एएमसी)चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प्रदीपकुमार यांच्याशी भास्कर'ने चर्चा केली.

तुमच्या कंपनीत नाेकरीसाठी पात्रता कायॽ

सर्वसाधारणपणे किमान पात्रता पदवी आहे. मात्र, कामाच्या आधारावर आवश्यक बदल केला आहे. आम्ही एक सेबी नियामक शाखा आहाेत आणि त्यामुळे निवडीसाठी सर्वात महत्त्वाच्या मानकापैकी एक एनआयएसएम ५ प्रमाणपत्र आहे. काही कामांसाठी याेग्य व्यावसायिकांची नियुक्ती करताे.

फ्रेशर्स, अनुभवी व्यावसायिकासाठी काेणती संधीॽ

गुंतवणूक आणि विक्री कार्यासाठीही संपत्ती व्यवस्थापन कंपनीचे प्रमुख ड्रायव्हर आहेत. आम्ही नवी युवा पिढी ज्याला जनरेशन झेड संबाेधले जाते, त्यांचे स्वागत करताे. त्यांच्यासाठी अशा मार्गाचा विकास करताे, जिथे उच्च जबाबदाऱ्या पेलल्या जातील. उदाहरणार्थ, रिलेशनशिप एक्झिक्युटीव्हही लीडरशिप करू शकताे.

काेणत्या एचआर काैशल्याचा उपयाेग करताॽ

म्युच्युअल फंड उद्याेगाचा डाेमेन नाॅलेज, वित्तीय बाजाराची माहिती, प्राे-अॅक्टिव्हनेस, कम्युनिकेशन स्किल आदीत सतर्क असायला हवे. त्यातून त्यात महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही संघ भावना जाेपासणाऱ्या व्यक्तींना पसंत करताे.

मुलाखतीसाठी कशी तयारी केली पाहिजेॽ

उमेदवाराने सामान्यपणे उद्याेगाचा आणि विशेषत: कंपनीचा अभ्यास करावा. तयारीच यशाचे भांडवल आहे. त्याने वर्तमानातील घटनांसाेबत अप टू डेट असावे. त्याने प्रामाणिकपणा, याेग्य दृष्टिकाेन आणि शिकणे व याेगदानाची इच्छा दाखवली पाहिजे.

बहुतांश नाेकऱ्या काेणत्या विभागात आहेतॽ

आमच्याकडे भारतातील जवळपास ६३ शहरांत विक्रीची टीम आहे. विक्री आणि ग्राहक सेवा कामात जास्त नाेकऱ्या असतात.

नाेकरीसाठी अर्ज कसा करता येईलॽ

अर्ज मागवण्यासाठी प्रमुख ठिकाणी आम्ही जाहिरात प्रकाशित करताे. कॅम्पस निवड करून त्यांना इंटर्नच्या रूपात नियुक्त करताे. यादरम्यान त्यांची कामगिरी चांगली राहिल्यास त्यांना प्री-प्लेसमेंट अाॅफरही देताे.

प्रज्ञावंतांना जोडण्यासाठी अडचणी आहेत का?

उद्योग वेगाने वाढत आहे आणि रोजगार इच्छुकांच्या संधीतही वाढ झाली आहे. आम्ही स्वत:ला वारंवार हा प्रश्न विचारतो की, कर्मचाऱ्याने कंपनीसोबत का राहावे? योग्य व्यक्तीस कामावर ठेवण्यात कंपनीची संस्कृती खूप महत्त्वाची भूमिका निभावली जाते. कंपनीच्या स्थापनेनंतर आमची उच्चस्तरीय व्यवस्थापन टीम आमच्यासोबत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

भरती प्रक्रियेत काेणत्या प्रकारचा बदल झालाॽ

आम्ही दूरवरच्या ठिकाणांवरील उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी अाॅडिअाे आणि व्हिडिअाे काॅन्फरन्सिंग उपकरणांचा उपयाेग करताे. अनेक कंपन्या आपल्या चुकांतून शिकतात व प्रतिभावान व्यक्तींच्या भरतीसाठी नवी प्रक्रिया आणि उपकरणे आणली आहेत.

५ लाख वितरक समाविष्ट होतील ५ वर्षांत म्युच्युअल फंड उद्योगात

 • देशात ४४ कंपन्या म्युच्युअल फंड उद्योगात काम करत आहेत.
 • २०,००० कर्मचारी थेट या उद्योगाशी जोडले जातील.
 • एक लाख लोक वितरकाच्या रूपात काम करत आहेत.
 • ५-१० हजार दर वर्षी नव्या वितरकाच्या रूपात समाविष्ट होत आहेत.
 • ५ लाख लोक नव्या वितरकाच्या रूपात ५ वर्षांत समाविष्ट होऊ शकतात.
 • ५००-६०० नवे कर्मचारी दरवर्षी समाविष्ट होत आहेत.
 • २७.२६ लाख कोटी रु.च्या संपत्तीचे व्यवस्थापन करत होते डिसेंबर २०१९ पर्यंत.
 • १६% दराने वृद्धी करत आहेत देशाच्या म्युच्युअल फंड उद्योगात.
 • ८.७१ कोटीपर्यंत पोहोचली होती ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण खात्यांची संख्या.

या पदावर नोकरीची संधी

 • फंड मॅनेजर
 • डिस्ट्रिब्यूटर
 • रिस्क मॅनेजर
 • कम्पलायन्स मॅनेजर
 • रिस्क डोमेन
 • सेल्स एजंट
 • कस्टमर सर्व्हिस
 • अकाउंटंट
 • एचआर एक्झिक्युटिव्ह
 • आयटी टेक्निशियन

जी प्रदीपकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी