आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • We Provide Medicine Like As Swiggy Provide Food, So We Do Not Need License : E pharmacy

स्विगी जेवण पुरवते तसे आम्ही औषध, परवाना गरजेचा नाही : ई-फार्मसीज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ई-फार्मसीजने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात ऑनलाइन औषध विक्रीबाबत बाजू मांडत परवान्याची गरज नसल्याचे सांगितले. आम्ही औषध विकत नाहीत, तर अन्न पुरवणारे अॅप स्विगीप्रमाणे प्रत्येक प्रकारचे औषध पुरवतो, असे ई-फार्मसीजने स्पष्ट केले आहे. ई-फार्मसीजने युक्तिवाद केला की, स्विगीला जसे रेस्तराँच्या परवान्याची गरज नाही, त्याचप्रमाणे त्यांनाही ऑनलाइन औषध खरेदी करणाऱ्यांना पुरवठा करण्यासाठी परवान्याची गरज नाही. उच्च न्यायालयाने औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न करण्याविरुद्ध दाखल अवमानना याचिकेवरील सुनावणीदरम्यान ई-फार्मसीजने वरील युक्तिवाद केला. या कंपन्यांविरुद्ध पाऊल न उचलल्याप्रकरणाच्या याचिकेेत केंद्राविरुद्धही कारवाई करण्याची मागणी केली आहे. असे असले तरी केंद्राने न्यायालयात सांगितले की, ई-फार्मसीजला नियंत्रित करण्यासाठी नियम तयार करण्याची प्रक्रिया विचाराधीन आहे.
 

बातम्या आणखी आहेत...