पाकिस्तान / अमेरिकेने सोव्हिएतविरोधी युद्धात पाकिस्तानी जिहादींना प्रशिक्षण दिले, आता त्यांच्यावर बंदी आणणे योग्य नाही -पाक पंतप्रधान इम्रान खान

अमेरिकेनेच दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिली, अपयशी ठरले तेव्हा दहशतवादी ठरवले -इम्रान

Sep 13,2019 03:16:04 PM IST


इस्लामाबाद - पाकिस्तानने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कबूल केले. मात्र ते दहशतवादी नाही तर जिहादी असल्याचे ते म्हणाले. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांनी शुक्रवारी सांगितले की, सोव्हिएत संघाने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या देशाने अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या मदतीने जिहादींना प्रशिक्षण दिले होते. दहा वर्षानंतर अमेरिका तिथे पोचला आणि प्रदीर्घ संघर्षानंतरही त्यांना यश मिळवता आले नाही. तेव्हा मुजाहिद्दीनला दहशतवादी घोषित करण्यात आले आणि पाकिस्तानला दोषी ठरवण्यात येत आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, '80 च्या दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तान ताब्यात घेतला तेव्हा आम्ही या मुजाहिद्दीनला सोव्हिएत संघाच्या विरोधात जिहाद करण्यासाठी प्रशिक्षण देत होतो. त्यामुळे या लोकांना पाकिस्तानने प्रशिक्षण दिले आहे. तर, या लोकांना पाकिस्तानकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने त्यांना मदत प्रदान केली'


आम्ही देखील आपचे 70,000 हजार लोक गमावले आहेत. आमच्या अर्थव्यवस्थेतून 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सरतेशेवटी, अमेरिकेला अफगाणिस्तानात यश न मिळाल्याबद्दल आम्हाला दोषी ठरवण्यात आले. मला वाटते की हे पाकिस्तानशी अत्यंत अन्यायकारक आहे असे इम्रान म्हणाले.

X