आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या लोकांच्या कुंडलीत नवग्रहाशी संबंधित एखादा दोष असल्यास त्यांना देवी-देवतांची कृपा प्राप्त होत नाही. यामुळे कामामध्ये अपयश मिळते आणि भाग्याची साथ मिळत नाही. घरामध्ये अशांती राहते. कुंडलीतील दोष आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. सामन्यतः बहुतांश उपाय किंवा पूजा-पाठ स्नान केल्यानंतर करावेत परंतु उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार काही शुभ काम स्नानापूर्वी केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, कोणते आहेत हे शुभ काम...
पहिले काम
शास्त्रानुसार व्यक्तीने ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. जो व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपतो, त्याची बुद्धी कमी होते आणि दुर्भाग्य वाढते.
दुसरे काम
स्त्री असो वा पुरुष, रोज सकाळी उठताच करावा या मंत्राचा जप..
मंत्र-
ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुः शशी भूमिसुतो बुधश्च।
गुरुश्च शुक्रः शनि राहुकेतवः कुर्वन्तु सर्वे ममसुप्रभातम्॥
या मंत्राचा जप केल्याने सर्व देवी-देवता आणि नवग्रहांची कृपा प्राप्त होते. या मंत्राचा अर्थ- ब्रह्मा, विष्णू, शिव, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू या सर्व देवतांनी माझी प्रातःकाळ म्हणजे सकाळ मंगलमय करावी. हे शुभ काम सकाळी उठताच केल्यास दुर्भाग्यातून मुक्ती मिळू शकते.
तिसरे काम
आपल्या हाताच्या अग्रभागामध्ये देवी लक्ष्मी, मध्यभागात सरस्वती आणि मूळभागात भगवान विष्णूंचा वास आहे. यामुळे सकाळी उठताच आपल्या दोन्ही हाताचे दर्शन घेऊन खालील मंत्राचा उच्चार करावा.
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविंद: प्रभाते करदर्शनम्॥
चौथे काम
हिंदू धर्मामध्ये भूमी म्हणजे जमिनीलाचा देवीचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु आपल्याला या भूमी देवीवर पाय ठेवावे लागतात. सकाळी उठताच जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी व्यक्तीने येथे सांगण्यात आलेल्या मंत्राचा जप करत भूमी देवीकडे क्षमा याचना करावी.
मंत्र : समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डिते। विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.