Home | Jeevan Mantra | Dharm | We Should Not Do These 5 Works In Shravan Month

12 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत श्रावण मास : या 5 चुकांमुळे लाभप्रद होणार नाही शिव पूजा

रिलिजन डेस्क | Update - Aug 11, 2018, 12:06 AM IST

रविवार 12 ऑगस्ट ते रविवार 9 सप्टेंबरपर्यंत श्रावण मास आहे. या महिन्यात महादेवाची विशेष उपासना केली जाते.

 • We Should Not Do These 5 Works In Shravan Month

  रविवार 12 ऑगस्ट ते रविवार 9 सप्टेंबरपर्यंत श्रावण मास आहे. या महिन्यात महादेवाची विशेष उपासना केली जाते. हा महिना महादेवाचा अत्यंत प्रिय महिना आहे. यामुळे शिव मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी राहते. तुम्हालाही महादेवाला प्रसन्न करण्याची इच्छा असल्यास या महिन्यात पूजन कर्मसोबतच काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार महादेवाच्या भक्तांनी श्रावण महिन्यात 5 चुकांपासुन दूर राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या पाच चुका...


  पहिली चूक
  श्रावण मासात सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. सकाळी लवकर उठून स्नान करून शिवलिंगावर तांब्याच्या कलशाने जल अवश्य अर्पण करावे.


  दुसरी चूक
  शिवलिंगावर हळद अर्पण करू नये. हळदीचा स्त्रियांशी संबंधित आहे. ही जलधारीवर अर्पण करू शकता. जलधारी देवी पार्वतीचे स्वरूप मानले जाते. शिवलिंग पुरुष तत्त्वाचे प्रतीक आहे. यामुळे यावर हळद अर्पण करू नये.


  तिसरी चूक
  केतकीचे फुल शिव पूजेत वर्ज्य आहे. शिवपुराणानुसार प्राचीन काळात केतकीच्या झाडाने ब्रह्मदेवाच्या एका असत्यामध्ये साथ दिली होती, तेव्हापासून महादेवाच्या पूजेमध्ये हे फुल वर्ज्य आहे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन चुका....

 • We Should Not Do These 5 Works In Shravan Month

  चौथी चूक 
  शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये. शिवपुराणानुसार महादेवांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. शंखचूडचे लग्न तुळशीसोबत झाले होते. यामुळे शिव पूजेत तुळस वर्ज्य आहे.

 • We Should Not Do These 5 Works In Shravan Month

  पाचवी चूक 
  घरामध्ये मोठ्या आकाराचे शिवलिंग ठेवू नये. शास्त्रानुसार घरामध्ये छोटे शिवलिंग ठेवावे. आपल्या अंगठ्याच्या पहिल्या भागापेक्षा मोठे असेलेले शिवलिंग घरासाठी शुभ राहत नाही.

Trending