Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | We Should Remember These Chanakya niti For Happy Life

चाणक्य नीती : स्वतःच्या हितासाठी या 3 प्रकारच्या लोकांपासून दूर राहणेच योग्य ठरते

रिलिजन डेस्क | Update - Aug 08, 2018, 10:47 AM IST

सामान्यतः असे मानले जाते की, ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याने किंवा शिकवल्याने कोणताही व्यक्ती विद्वान होऊ शकतो, परंतु असे घडे

 • We Should Remember These Chanakya niti For Happy Life

  सामान्यतः असे मानले जाते की, ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्याने किंवा शिकवल्याने कोणताही व्यक्ती विद्वान होऊ शकतो, परंतु असे घडेलच यामध्ये शंका आहे. आचार्य चाणक्यांनी या संदर्भात एका नीतीमध्ये तीन अशा लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते. चाणक्य नीतीनुसार या तीन लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे.


  मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।
  दु:खिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति।।


  हा चाणक्य नितीमधील पहिल्या अध्यायातील चौथा श्लोक आहे. यामध्ये चाणक्यांनी सांगितले आहे की, काही लोकांचे भले करूनदेखील दुःखच प्राप्त होते. येथे जाणून घ्या, कोणकोण आहेत हे लोक...


  मूर्खाशिष्योपदेशेन म्हणजे मूर्ख शिष्याला उपदेश देणे
  एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश देऊ नये. मूर्ख व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी चुकीचा तर्क-वितरक करत राहतो. यांना समजून सांगणे खूप कठीण काम आहे. एखादा श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा एखाद्या मुर्खाला विद्वान बनवू शकत नाही. यामुळे मूर्ख लोकांसमोर ज्ञानाच्या गोष्टी करू नयेत, अन्यथा आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन लोकांविषयी...

 • We Should Remember These Chanakya niti For Happy Life

  वाईट स्वभावाची स्त्री
  जर एखादी स्त्री वाईट स्वभावाची असेल आणि तिला फक्त पैशांचा मोह असेल तर पुरुषाने अशा स्त्रीपासून दूरच राहावे. समजूतदार पुरुष तोच आहे, जो अधार्मिक स्त्रीपासून दूर राहतो. धर्माच्या मार्गावरून भटकलेल्या स्त्रीचे भरण-पोषण केल्यानेही यश प्राप्त होत नाही. वाईट स्वभावाच्या स्त्री संपर्कात राहिल्यास कुटुंब आणि समाजात अपयशाची प्राप्ती होते.

 • We Should Remember These Chanakya niti For Happy Life

  दुःखी व्यक्ती
  जे लोक विनाकारण दुःखी राहतात, नेहमी देवाला दोष देत राहतात, आहे त्या सुख-सुविधांमध्ये संतुष्ट राहत नाहीत, इतरांचे सुख पाहू शकत नाहीत अशा लोकांपासून नेहमी दूरच राहण्यामध्ये शहाणपण आहे. हे लोक नेहमी दुःखी राहतात आणि जो व्यक्ती यांच्या संपर्कात येतो त्यालाही व्यर्थ गोष्टी सांगून-सांगून दुःखी करतात.

Trending