आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुतांश घरामध्ये रोज विधिव्रत पूजा होत नाही परंतु सकाळी आणि संध्यकाळी दिवा अवश्य लावला जातो. देवासमोर दिवा लावल्याने देवकृपा प्राप्त होऊ शकते. तूप आणि तेलाचा दिवा लावल्याने धार्मिक तसेच आर्थिक लाभही होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, दिव्याशी संबंधित काही खास गोष्टी...
1. घरामध्ये नियमितपणे दिवा लावल्यास नेहमी सकारात्मक ऊर्जा कायम राहते. दिव्याच्या धुराने वातावरणामध्ये उपस्थित हानिकारक सूक्ष किटाणू नष्ट होतात.
2. दिवा अंधकार दूर करून प्रकाश देतो. याच कारणामुळे घरामध्ये सकाळ-संध्याकाळ दिव्याचा प्रकाश असावा. यामुळे सकारत्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो.
3. शास्त्रानुसार रोज संध्याकाळी मुख्य दाराजवळ दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळेच संध्याकाळी मेनगेटजवळ दिवा लावण्याची प्रथा चालत आली आहे.
4. पूजा करताना देवी-देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा.
5. पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.
6. दिवा नेहमी देवाजवळच लावावा. कधीकधी लोक देवाची मूर्ती सोडून दिवा इकडे-तिकडे दूर ठिकाणी लावतात. हे योग्य नाही.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दिव्याशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.