आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये खंडित शिवलिंग ठेवू शकता, कारण हे महादेवाचे निराकार स्वरूप मानले गेले आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती आणि त्यांचे प्रतीक चिन्ह ठेवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मान्यतेनुसार घरामध्ये देव मूर्ती ठेवल्याने आणि रोज पूजा केल्याने वातावरण पवित्र राहते आणि नाकारत्मकता दूर होते. बहुतांश घरामध्ये शिवलिंग स्थापित केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शिवलिंग अत्यंत संवेदनशील मानले जाते. यामुळे घरामध्ये शिवलिंग असल्यास काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. 

  • देवी-देवतांच्या खंडित मूर्ती घरात ठेवू नयेत, परंतु शिवलिंग ठेवू शकता. कारण शिवलिंग कधीही खंडित मानले जात नाही. शिवलिंगला निराकार स्वरूप मानण्यात आले आहे. यामुळे खंडित शिवलिंगही पूजनीय आहे.
  • शिवपुराणानुसार, घरामध्ये जास्त मोठ्या आकाराचे शिवलिंग ठेवू नये. घरामध्ये छोटेसे शिवलिंग ठेवणे शुभ राहते.
  • आपल्या अंगठ्याच्या आकराएवढे शिवलिंग घरात ठेवावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे.
  • घरामध्ये शिवलिंग ठेवलेल्या ठिकाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. देवघरात पवित्रता आवश्यक आहे.
  • शिवलिंगाचे पूजन करताना भक्ताचे मुख उत्तर दिशेला असावे. हे सर्वश्रेष्ठ मानले जाते.
  • दररोज सकाळ-संध्याकाळ शिवलिंग पूजा अवश्य करावी. विधिव्रत पूजा करणे शक्य नसल्यास दिवा अवश्य लावावा. दिवा लावून ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप 108 वेळेस करावा. मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा.
  • शिवलिंगासोबतच श्रीगणेश, देवी पार्वती, नंदी यांच्याही मूर्ती ठेवाव्यात. पूजेच्या सुरुवातीला गणेश पूजन करावे.
  • शिवलिंगावर रोज जल, बेलाचे पान अर्पण करावे.
बातम्या आणखी आहेत...