आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुष्याचा एक तृितयांश भाग आपण झोपेत घालवतो; जाणून घ्या जास्त झोपण्याचे तोटे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोप, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे व आवश्यक असणारी अवस्था आहे. पण झोपेकरिता पैसे मोजावे लागत नसल्याने आपण फारसे लक्ष देत नाही. जी गोष्ट आपल्याकडे नसते तिचं महत्त्व जास्त जाणवत असतं तसंच जेव्हा आपल्याला झोप लागत नाही त्याचवेळी झोप किती महत्त्वाची हे लक्षात येतं. अन्नपाण्यावाचून माणूस काही दिवस जगू शकतो पण झोपेशिवाय दोन दिवस काढणे सर्वसामान्य व्यक्तीला अतिशय त्रासदायक ठरते. काहींची झोप कुंभकर्णा सारखी असते तर काहींची अतिशय सावध असते किंवा नेपोलियन सारखी, घोड्यावर बसलेले असताना सुद्धा झोप येते. आपण सर्वसाधारणपणे आयुष्याचा एक तृतियांश भाग झोपेत घालवतो पण या झोपेविषयी बरेच गैरसमज आजही दिसतात. 

 

झोप म्हणजे 'काहीही न करणं' जणूकाही मेंदू या काळात काहीच काम करत नाही किंवा मेंदू झोपलेला असतो. झोप ही सुद्धा जागेपणा सारखीच अवस्था आहे. त्यात मेंदूचा काही भाग अतिशय कार्यरत असतो मेंदूचे ऐकणे, बोलणे, दिसणे हे काम करणारे भाग शांत असतात पण त्याच वेळी मोठ्या मेंदूचा समोरील भाग दीडपट जोरात काम करत असतो याची जाणीव आपल्याला नसते. यातूनच नंतर मेंदूच्या इतर भागांना सूचना जातात. 


मी कुठेही कसाही झोपू शकतो. ! दिवसा सतत कुठेही झोपत असाल तर निश्‍चितपणे आपण जागे पणाचा कालावधी वाया घालवता. जागा असताना आपल्याला सतत सावध असावं लागतं तसेच कामामध्ये इतर गोष्टींमध्ये लक्ष द्यावं लागतं, त्याचा आनंद घ्यावा लागतो पण आपण दिवसाही झोपत असाल तर निश्‍चितपणे त्रासदायक ठरू शकते आपली कार्यक्षमता कमी होते. 

कमी झोप घेणारा अधिक हुशार किंवा कामसू तर 8 ते 10 तास झोपणारा आळशी दिसून येतो. झोपेत आपला मेंदू विश्रांती पण घेतो पण त्याचवेळी जे दिवसभर शिकलेलं असतं, अनुभवलेलं असतं, दिवसभरात झालेल्या भावनिक शारीरिक जखमान वरती काम करत असतो, त्या जखमा भरून काढत असतो. त्यामुळे आवश्यक तेवढा वेळ या मेंटेनन्स म्हणजे रखवाली च्या कामाला देणे अतिशय आवश्‍यक आहे. सतत कमी झोप ही बऱ्याच शारीरिक व्याधी म्हणजे ब्लड प्रेशर, डायबेटिस, स्थूलपणा यांना आमंत्रण देते. 

 

वृद्ध व्यक्तींना झोपेची गरज कमी असते अजिबात नाही सहा ते आठ तास झोप सर्वांना आवश्यक आहे . फक्त वय झाल्यानंतर सलग मात्र झोप लागत नाही , मधून मधून जाग येत राहते किंवा सकाळी लवकर जाग येते . रात्री चार ते पाच तास झोप होते पण दिवसभर आपण पेंग घेत असतो, टीव्ही बघताना ,पेपर वाचताना. थोडावेळ दिवसाकाठी व्यवस्थित झोपल्यास त्रास होत नाही. 

 

"निद्रानाश "हा अतिशय दुर्लक्षित असा त्रास आहे. भारतात जवळपास २५ ते ३० टक्के लोकांना त्रास असू शकतो असे एका पाहणीत आढळले आहे. निद्रानाशा मुळे शरीरावर, मानसिक स्थितीवर परिणाम होतो. लक्ष विचलित झाल्यामुळे कामावर लक्ष लागत नाही ,मुलं असतील तर अभ्यासावर लक्ष लागत नाही, चिडचिड होते , लक्षात राहत नाही, असं एकंदरीतच तुमचे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. चुका व्हायला लागतात. दिवसा झोपेची पेंग आली तर अपघाताची शक्यता वाढते. कधीकधी निद्रा नशामागे मनोविकार, चिंता, औदासिन्य आहेत की काय याचा विचार करणे, तपास करणे आवश्यक असतं. जर आपण मनोविकारावर उपचार केला तर निश्चितपणे निद्रानाशापासून आपली सुटका होते आणि आपली झोप ही सुखद होऊन दिनक्रम व्यवस्थित सुरू राहील . झोपेची काळजी कशी घ्यावी- सर्वसाधारणपणे काय पथ्य पाळावे म्हणजेझोपेचे चक्र नीट , संतुलित राहील. योग्य वातावरण निर्मिती स्वच्छ जागा त्याच जागी झोपणे शांतता पाहिजे अंधार करावा झोपेच्या ठिकाणी इतर काही म्हणजे बसून गप्पा मारण किंवा जेवण करणं नको. 

 

झोपेच्या अगोदर टीव्ही बघणे, मोबाइल बघणे , लॅपटॉपवर काम करणे अर्धा तास अगोदर तरी बंद करा. थोडा वेळ शवासन करा. थोडा वेळ वाचन करू शकता पण टीव्ही मोबाईल नक्कीच नको. मंद संगीत ऐकू शकता जे तुमच्या झोपायला सहाय्यक ठरू शकतं. झोपे अगोदर गरम पाण्याने अंघोळ केली शरीर रिलॅक्स होतं. झोपायच्या अगोदर, संध्याकाळपासूनच चहा-कॉफी सारखी उत्तेजक पेय टाळा. झोपेच्या मधेच जाग आल्यास अंथरुणातून उठू नका, मोबाईल चेक करू नका, डोळे बंद करून शांतपणे दीर्घश्वसन करा प्रयत्न करावा , झोप लागेल. झोपेची औषधे , डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध सुरू करू नका किंवा चालू ठेवू नका. त्यामुळे झोपेच्या गोळ्यांची सवय लागू शकते जे पुढे त्रासदायक ठरू शकते. शेवटी झोपेच्या विकाराबद्दल काही चाचण्या पण स्लिप लॅब मध्ये होऊ शकतात. मुख्यतः यावर तज्ञांच्या सल्ल्याने तपासणी करून उपाय केल्यास त्यापासून उद्भवणारे आजार आपण निश्चितपणे टाळू शकतो. आपणा सर्वांना निद्रादेवी कायम प्रसन्न राहो हीच सदिच्छा