आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा वाघ यांना आम्हीच काढणार होतो, उशीर झाला, डॉ. फौजिया खान यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पक्षातील कार्यपद्धतीवर सर्वच महिला पदाधिकारी नाराज होत्या. पक्षच त्यांना या पदावरून दूर सारणार होता, मात्र थोडा उशीरच झाला, असा दावा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.फौजिया खान यांनी शनिवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत केला.सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अन्य पक्षातील मंडळींना एक तर भीती दाखवली जात आहे वा लालच दाखवून त्यांचे पक्ष प्रवेश घडवून आणले जात आहेत, असाही आरोप श्रीमती खान यांनी या वेळी केला. 


राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेतेमंडळी भाजप व शिवसेनेत जात आहेत. याला त्यांची वैयक्तिक कारणे कारणीभूत आहेत. याच कारणांचा आधार सत्ताधारी घेऊ लागले आहेत. त्यामुळे आयाराम-गयारामचे सत्र सुरू झाले आहे. राजकीय वलयाला सुरक्षीतता मिळवून घेण्याच्या दृष्टीने हे प्रकार सुरू झाले आहेत.  त्याच वेळी भाजप शिवसेनेतूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांची संख्याही चांगलीच आहे, असे श्रीमती खान यांनी नमुद केल्यानंतर त्याबाबतची नावे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दर्शवला. भारतीय जनता पक्ष म्हणजे आर.ओ. प्लॅन्ट सारखा आहे. अन्य पक्षात असलेल्या मंडळींना घेऊन त्यांना शुद्ध प्रक्रियाच जणू भाजपमध्ये सुरू झाल्याचा आरोप ही श्रीमती खान यांनी या वेळी केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जलील पटेल हे उपस्थित होते.
 

फौजिया खान यांनी दिले चाकणकरांना नियुक्तिपत्र
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपला पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या जागेवर पुण्याच्या जिल्हाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी चाकणकर यांना नियुक्तीचे पत्र दिले.

बातम्या आणखी आहेत...