आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही कमळ चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवणार : सदाभाऊ खाेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - रयत क्रांती संघटनेची ६ जूनला बैठक पुण्यात होणार आहे. दुष्काळ, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि विधानसभेच्या भूमिकेबाबत यात विचारमंथन करण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित राहतील. आमची संघटना असल्याने आम्ही कमळ चिन्हावरच येणारी निवडणूक लढवणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.


खोत म्हणाले, ‘गेल्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही महायुतीसाेबत हाेताे. आता लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही लढलो नाही. मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांना विधानसभेत जागा देऊ, असे सांगितले आहे. परंतु अद्याप चर्चा झालेली नाही. ६ जूनला आम्ही रयत क्रांती संघटनेची बैठक पुण्यात घेणार असून, यात दुष्काळ, शेतकऱ्यांच्या मागण्या व विधानसभेतील भूमिका याबाबत विचारमंथन करू.त्यानंतर आम्ही सर्व मित्रपक्ष जागांसंदर्भात विचारविनिमय करून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करून एकत्रित निर्णय घेऊ.’