आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, मी प्रशासन आणि नियंत्रण कक्षाच्या संपर्कात - मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला असून, अनेकांचे नुकसान झाले आहे. पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तात्काळ मदत देवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिले. 

काय म्हणाले मुख्यमंत्री ?
पुण्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे. काही जण वाहून गेले आहेत. मी सतत जिल्हाधिकारी आणि नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. एनडीआरफच्या 2 तुकड्या तेथे पाठवण्यात आल्या असून आतापर्यंत 15 हजार लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. बारामतीतील कऱ्हा नदीलाही पूर आला आहे. प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकार बारकाईने नजर ठेवून आहे.

पावसामुळे पुण्यात मोठे नुकसान 
पुणे शहर व उपनगरांत बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. पुण्यातील कात्रज, सिंहगड रोड आणि परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. तर विविध ठिकाणी 18 जणांचा मृत्यू झाला आहे.