आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू : अमित शहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर देशाचे तुकडे करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला आहे. मनमानी खपवून घेतली जाणार नाही. जयपूरमध्ये एका कार्यक्रमात शहा म्हणाले, भाजपला जेवढे वाईट बोलायचे तेवढा बोला. मात्र, दोषींची गय केली जाणार नाही. शहा यांचे वक्तव्य कोरेगाव भीमा हिंसाचार व नक्षल्यांच्या संबंधावरून केलेल्या अटकेशी जोडले जात आहे. देशातील कोट्यवधींचा हक्क हिरावला जात आहे. आम्ही सर्व घुसखोरांना एक-एक करून शोधू आणि देशाबाहेर काढू. मतपेढीची चिंता करणारे मानवी हक्काच्या गोष्टी करतात, त्यांना या देशाची व या देशातील गरिबीची चिंता नाही. आम्हाला तर निर्वासितांचीही चिंता आहे. 
 

काँग्रेसने नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात २४९ काेटींचा कर लपवला : शहा 
शहा यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केले. ते म्हणाले, न्यायालयाने नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्यांना कर न भरण्याचा तर्क अायकर विभागाकडे मांडण्यास सांगितले. कर भरण्यापासून वाचण्यासाठी येथे यायची गरज नाही, असे सांगितले. काँग्रेस नेत्यांनी २४९ काेटींचा कर लपवला. तसेच त्यांनी ९० लाख रुपये कर्जाबद्दलही उत्तर दिलेले नाही. भाजपचा लाेकशाहीवर विश्वास अाहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी अाम्हाला प्रश्न विचारण्याएेवजी स्वत:च्या पक्षात लाेकशाही रुजवावी. २०१३ पर्यंत देशात सातत्याने घाेटाळे झाले. तेव्हा सरकारमधील प्रत्येक जण स्वत:ला पीएम समजत हाेता, असेही शहा म्हणाले. 


कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित होता : तपास समितीचा दावा 
मुंबई : काही संघटनांनी नेमलेल्या सत्यशोधन समितीने केलेल्या चौकशीत कोरेगाव भीमा हिंसाचाराची घटना पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व पूर्वनियोजित होती, तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांनी मागासवर्गीयांच्या इतिहासाशी छेडछाड करण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती, असा निष्कर्ष काढला आहे. 


राम माधव म्हणाले- एनअारसीत नावे नसलेल्यांना त्यांच्या देशात परत पाठवू 
दिल्लीतील एका परिषदेत भाजपचे महासचिव राम माधव म्हणाले की, एनअारसीच्या शेवटच्या यादीत नावे नसलेल्यांना त्यांच्या देशात परत पाठवू. एनअारसी अपडेट केली जातेय. त्यामुळे सर्व अवैध प्रवाशांची अाेळख समाेर येईल. तसेच पुढील टप्पा 'मिटवण्याचा' असेल. त्यानंतर अवैध प्रवाशांची नावे मतदार याद्यांतून वगळली जातील. 


अासामचे सीएम म्हणाले- एनअारसीत समावेश नसलेले इतर राज्यांत वास्तव्य करण्याचा धाेका 
अासामचे मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल म्हणाले की, एनअारसी संपूर्ण भारतात लागू केली पाहिजे. कारण सर्व भारतीयांना संरक्षण देऊ शकेल असा हा दस्तएेवज अाहे. तसेच अासाममध्ये एनअारसीत समावेश नसलेले इतर राज्यांत जाऊ शकतात. त्यामुळे अाम्हाला कठाेर पावले उचलावी लागतील. 

बातम्या आणखी आहेत...