आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उत्तर प्रदेशप्रमाणे आम्हीदेखील सार्वजनिक संपत्तीची नासधुस करणाऱ्यांना गोळी मारू'- भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ममता बनर्जी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्यांविरोधात काहीच कारवाई करत नाही'

नादिया (पश्चिम बंगाल)- "उत्तर प्रदेशप्रमाणे आम्हीदेखील सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना गोळी मारू", असे विधान पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी रविवारी केली. पुढे ते म्हणाले की, "उत्तर प्रदेशच्या सरकारने अशा लोकांना फक्त ताब्यात घेतले नाही तर त्यांच्यावर लाठीचार्ज आणि गोळीबारही केला."

खडगपूरचे खासदार दिलीप घोष नागरिकत्व कायद्याच्या समर्थानासाठी झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींवर सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहचवणाऱ्यांवर काहीच कारवाई न करण्याचा आरोप लावला आहे.

‘सार्वजनिक संपत्ती करदात्यांची’

घोष पुढे म्हणाले की, "ते लोक सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहचवत आहेत. ही संपत्ती त्यांच्या बापाची आहे का? सार्वजनिक संपत्ती करदात्यांची आहे. ममता बॅनर्जी याबाबत काहीच बोलत नाहीत. असाम आणि उत्तर प्रदेशमधील आमच्या सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई केली."

‘आमचं खाऊन आमच्याच संपत्तीला नुकसान पोहचवतात’

पुढे ते म्हणाले की, "तुम्ही आमच्या येथे येतात, आमचं खातात आणि आमच्याच संपत्तीला नुकसान पोहचवतात. हीच तुमची इमानदारी आहा का? आम्ही तुम्हाला लाठ्याने मारू, तुम्हाला गोळी मारू आणि तुरुंगात टाकू."

बातम्या आणखी आहेत...