सत्ता संघर्ष / 'आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही', निकालानंतर शरद पवारांचे स्पष्टीकरण

'पावसातील भाषणामुळे लोकांचे मत परिवर्तन झाले'

दिव्य मराठी वेब टीम

Oct 25,2019 01:36:00 PM IST

बारामती- कालच्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेचे पारडे जडं झाल्याचे दिसत आहे. विधानसभेत भाजपला आपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आता शिवसेना आपल्या अटींच्या जोरावर सत्ता स्थापन करू शकते. दरम्यान, काल निकालानंतर काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार असल्याचा चर्चा रंगू लागल्या होत्या. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी याबाब स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "विरोधी बाकावर बसणे पसंत करू, पण सत्तेत जाणार नाही."

काल विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. 'अबकी बार 220 पार' म्हनणाऱ्या महायुतीला 170 चाही पल्ला गाठता आला नाही. निवडणुकीते भाजप-शिवसेनेच्या महायुतीने 161 जागा मिळवल्या. या निकालानंतर राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुती सत्ता स्थापन करणार हे जवळ-जवळ निश्चित आहे. पण, कालच्या निकालानंतर काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार, अशा चर्चा रंगू लागल्या. पण, यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. शरद पवार म्हणाले की, "आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यांच्यासोबत जाण्याचा काही संबंध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायम एकत्र राहील. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडू. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवू. जनतेने आम्हाला विरोधी बाकात बसवले आहे, त्यामुळे आम्ही विरोधक म्हणून भूमिका मांडत राहू.", असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

X
COMMENT