Home | Maharashtra | Mumbai | we would win the assembly election by using the strategy of Shivaji Maharaj ; Devendra Fadnavis

शिवाजी महाराजांप्रमाणे रणनिती वापरून विधानसभा जिंकू; भ्रष्ट व्यवस्थेचा कोथळा बाहेर काढू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 21, 2019, 07:44 PM IST

एक ऑगस्ट ते 31 दरम्यान राज्यभर मुख्यमंत्री काढणार महाजनादेश यात्रा

 • we would win the assembly election by using the strategy of Shivaji Maharaj ; Devendra Fadnavis


  मुंबई - भाजपच्या मुंबईतील राज्य कार्यकारिणीची बैठक आज (रविवार दि 21) पार आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. आगामी विधानसभेसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 दरम्यान मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काय तयारी करावी लागणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.


  काय म्हणाले मुख्यमंत्री?

  > महाराष्ट्राची जनता हेच माझे दैवत
  महाराष्ट्राचे नागरिक हेच माझे दैवत आणि त्यांचा पाठिंबा हीच माझी दैवी शक्ती आहे. गेल्या 5 वर्षातील आंदोलनं ही आघाडी सरकारचीच पापं आहेत. पण असे असले तरी शेती संकट, दुष्काळ संकट, आरक्षणाचे मुद्दे इत्यादी आपण दैवी शक्तीच्या पाठिंब्याने सहजपणे पेलू शकलो.

  > सामान्य माणसांपर्यंत पोहचण्यसाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन

  मुख्यमंत्री एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यभर महाजनादेश यात्रेचे आयोजन करणार आहेत. सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी जनआदेश यात्रा काढणार आहे. ही यात्रा फक्त कार्यकर्त्यांसाठी नाही तर सर्वांसाठी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  > लोकसभेतील विजयाने हुरळून जाऊ नका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला
  यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभेतील विजयाने हुरळून न जाता विधानसभेच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला. यावेळी अब की बार 220 पार करायचे आहे. तिकीटासाठी हमरीतुमरी वर येऊ नका. तुमचे काम पाहून तुम्हाला तिकीट देण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.


  > दुष्काळावरून विरोधकांवर टीका
  मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान विरोधकांवरही टीका केली. दुष्काळ विरोधकांसाठी सुकाळ होता असे ते म्हणाले. विरोधकांनी दुष्काळावर उपाय योजना करण्याऐवजी निधी लाटण्याचा प्रयत्न केला. पण आता या पिढीने दुष्काळ पाहिला पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. आम्ही दुष्काळाला भूतकाळात जमा करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.


  > शिवसेना - भाजपात कोणतेही वाद नाहीत
  शिवसेना-भाजपात मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु असल्याची चर्चा आहे. पण आमच्यात असा कोणताही वाद नसल्याचे फडणवीस म्हणाले. हे भाजप-सेनेचे सरकार आहे. त्यामुळे मी एकट्या भाजपचा नाही तर सेनेचाही मुख्यमंत्री आहे. यावरून आगामी विधानसभेत भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  > शिवाजी महाराजांप्रमाणे रणनिती वापरून विधानसभा जिंकू
  शिवाजी महाराजांनी जसा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता तसा भ्रष्ट व्यवस्थेचा कोथळा बाहेर काढण्यासाठी ही लढाई जिंकायची आहे. शिवाजी महाराचांप्रमाणे रणनिती वापरून आगामी विधानसभा जिंकणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Trending