आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वर्षी येणार 500 पेक्षा जास्त वेब सीरीज, काहींवर होणार 100-100 कोटी रुपये खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. नवीन वर्ष हे वेबसीरीजच्या नावे असणार आहे. कबीर खान, अली अब्बास जफर, एकता कपूर, एक्सेलसोबतच अनेक मोठे स्टार्स 2019 मध्ये 100-100 कोटींच्या बजेटचे अनेक शोज घेऊन येत आहेत. फक्त नेटफ्लिक्सवर 16 ऑरिजनल येतील. 12 वर एमेजॉनवाले काम करत आहे. एपलॉज एन्टटेन्मेंटही 45 वेब शोज घेऊन येणार आहे. 20 पेक्षा जास्त शोजवर एकता कपूर काम करतेय. तर 20 वर रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरची कंपनी एक्सेल काम सुरु करेल. 15 ते 20 शोज छोट्या स्तरातील प्रोडक्शन हाउन बनवत आहेत. विशेष म्हणजे हिंदी, तामिळ, तेलुगूसोबतच भोजपुरीमध्येही वेब शोज बनत आहेत. 


गोल्डी बहल, सुधीर मिश्रा, तिग्मांशुची तयारी पुर्ण
सध्या एपलॉजवाले सर्वात जास्त बनवत आहेत. त्याचे प्रमुख समीर नायर म्हणतात की, 8-10 प्रोड्क्शनमध्ये आहेत. 6-8 तात्काळ प्रोडक्शनमध्ये जात आहेत. आम्ही टेलीकॉम कंपन्या, ओटीटी, ब्रॉडकस्टसोबतच सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मचे शोज बनवत आहोत. आमच्या 6 शोजची डिलीवरी सुरु झाली आहे. यासोबतच गोल्डी बहलने 'स्ट्रेन्जर्स' बनवले आहे. सुधीर मिश्राच्या 'हॉस्टेजेस' आणि तिग्मांशु धूलियाची 'क्रिमिनल जस्टिस'ही शूट झाली आहे. स्वरा भास्करची 'रसभरी' आणि रणवीर शौरीचे वेब शोही तयार आहेत.

 

हंसल, वीर दाससोबतच निखलही बनवतोय शेअर मार्केटवर वेबसीरीजच्या
हंसल मेहताचे 'द स्कॅम' सुरु होणार आहे. ही बेबसीरीज हर्षद मेहताच्या शेअर घोटाळ्यावर आधारित आहे. निखील अडवाणीही वीर दाससोबत एक शो आणत आहेत. ई. निवास यांचा एक लीगल ड्रामा आहे. 'हर गोली पे नाव' भोजपुरी वेब शो आहे. ही दोन गँगस्टरची कथा आहे. 

 

पुढच्या 5 वर्षांमध्ये 500 पेक्षा जास्त शो येतील 
हे शो विनाकारण बनत नाही. याच्या रिकवरीचे अनेक माध्यम आहेत. यूट्यूब, वूट, सोनी लिव्ह अॅड सपोर्टर आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्म सब्सक्रिप्शन सपोर्टर आहेत. जियो, वोडाफोनसारके टेलिकॉम ऑपरेटरही वेब सीरीजची तयारी करत आहेत. हे यूजरच्या डेटा कजप्शनमधून कमावतात. जानकारांनुसार, भारतात पुढच्या तीन वर्षात 500 पेक्षा जास्त वेब शोज कंज्यूम करण्याची कॅपेसिटी आहे. यामुळे हे शो तयार होत आहेत. 

 

थिएटरला मिळते आव्हान, पुढच्या पाच वर्षांमध्ये 500 कोटींचा वेब शो बनेल : रितेश 
रितेश देशमुख अभिनयासोबतच चित्रपटाची निर्मितीही करतो. तो मराठी चित्रपटांचा एक मोठा प्रोड्यूसर आहे. रितेशही मानतो की, थिएटर्सला आता वेब शोजचे तगडे आव्हान मिळतेय. कारण डिजिटल प्लॅटफॉर्म प्रेक्षकांचा वेळ वाचवतो. यासोबतच कोणत्याही वेळी, टीव्ही शोज आणि एन्टटेन्मेंट कन्टेट उपलब्ध करुन देते. यामुळे थिएटरमध्ये जाण्याची सवय कमी होतोय. रितेश म्हणतो की, 'दंगल' सुपरहिट चित्रपट होता. पण चित्रपट गृहात तो फक्त साडे तीन कोटी लोकांनी पाहिला. एवढ्यातच चित्रपटाने पाच आठवड्यात 376 कोटी कमावले होते. हिशोब लावला तर साडे तीन कोटी प्रेक्षक हे एकुण लोकसंख्येच्या पाच टक्केही नाहीत. इतर 90 आणि 95 टक्के प्रेक्षक हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पोहोचतात. जर मेकर्स त्या ऑडियन्सपर्यंत पोहोचले, तर कमाईचा आकडा उंच शिखरावर पोहोचेल. 

 

डिजिटल प्लॅटफॉर्मवर 10 टक्के जास्त ऑडियन्स 
रितेश म्हणतो की, सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याला चित्रपटगृहांच्या तुलनेत जास्त ऑडियन्स देत आहे. अशा वेळी एखादा मेकर आपल्या ईगोला सॅटिसफाय करण्यासाठी चित्रपटगृहासाठी कन्टेट का बनवेल?आज जर 100-100 कोटींचे वेब शोज बनत असतील तर येत्या काळात 500 कोटींचेही बनतील. यामुळे लोक जास्त वेळ पाहू शकतील. यासोबतच सर्व काही मोबाइलवर उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षकांची संख्या वाढेल. पुढच्या चार वर्षात स्मार्टफोन वापरणा-यांची संख्या 50 कोटींपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे लोक चित्रपटगृहांकडे पाठ वळवू शकतात.

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...