Home | Business | Business Special | Wedding Auli with exotic flowers of 5 crores for wedding

Royal wedding/ लग्नासाठी 5 कोटींच्या विदेशी फुलांनी सजले औली गाव, चित्रपटांसारखे सेट केले उभे; लग्नपत्रिकेसाठी वापरली 5 किलो चांदी

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 21, 2019, 04:34 PM IST

200 कोटी रूपये खर्चाच्या या लग्नात देश-विदेशातील व्यावसायिकांसह सेलेब्रिटींची उपस्थिती

 • Wedding Auli with exotic flowers of 5 crores for wedding

  नवी दिल्ली - स्वित्झर्लँडच्या दावोस सारखे बर्फाळ डोंगर आणि स्काइंड सेंटर असणाऱ्या उत्तराखंडच्या औलीतील शाही विवाह सध्याचा चर्चेचा विषय बनला आहे. येथे भारतीय मुळचे दक्षिण आफ्रिकाचे उद्योगपती गुप्ता बंधूंच्या मुलांचा विवाह समारोहाला सुरुवात झाली आहे. तब्बल 200 कोटी रूपये खर्च करण्यात आलेल्या या लग्नात पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी औलीला 5 कोटी रूपयांच्या परदेशी फुलांनी सजवण्यात आले आहे. एवढेच नाही तर लग्नासाठी चित्रपटांचे सेट उभारण्यात आले आहेत. तसेच लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील वेगळी आहे. यासाठी 5 किलो चांदी वापरण्यात आली आहे. याच्या पानांवर औली आणी बद्रीनाथाचे फोटो देखील लावले आहेत.


  जगविख्यात कलाकार विवाह सोहळ्यास लावणार हजेरी

  औलीच्या हॉटेल क्लिपमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. यासाठी हॉटलेला लाइटिंगने सजविण्यात आले आहे. अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडीस, कॅटरिना कॅफ, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहिद कपूर यांसारखे कलाकार या विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवणार असल्याचे गुप्ता कुटुंबातील लोकांनी सांगितले. गुप्ता बंधुंच्या दोन्ही मुलांचे लग्न 100 ब्राह्मण पार पाडणार आहे. यामध्ये अवधेशानंद महाराज मुख्य पुजारी असतील. याशिवाय कथा वाचक रमेश भाई ओझा देखील आपली उपस्थिती लावणार आहेत. या विवाह समारंभात बॉलीवूडचे कलाकार येणार असुन ते याठिकाणी सादरीकरण देखील करणार आहेत.


  यांचे आहे लग्न
  समुद्रसपाटीपासून 9500 ते 10500 फूट उंचीवर स्थित विश्व प्रसिद्ध हिम क्रीडा केंद्र ओली सध्या गुप्ता बंधुंच्या मुलांच्या विवाह समारंभाच्या तयारीमुळे चर्चेचा विषय ठरले आहे. उद्योगपती अजय गुप्ता यांचे चिरंजीव सूर्यकांतचा विवाह दिल्लीचे हिरा व्यापारी सुरेश सिंघल यांची मुलगी कृतिका तर अतुल गुप्ताचे चिरंजीव शशांकचा विवाह दुबईचे रिअल स्टेट व्यावसायिक विशाल जलान यांची मुलगी शिवांगीसोबत होणार आहे. सूर्यकांतचा विवाह 20 जून रोजी पार पडला तर शशांकचा विवाह 22 जून रोजी पार पडणार आहे. सोमवार पासून विवाह समारंभाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

  इटलीमध्ये करणार होते मुलांचे लग्न
  गुप्ता बंधुंनुसार त्यांना आपल्या मुलांचे लग्न इटलीमध्ये करायचे होते. पण राज्य सरकारच्या उत्तराखंडला वेडिंग डेस्टिनेशन बनवण्याचा उद्देश पाहता त्यांना यासाठी औलीची निवड केली. स्थानिक गावांतील सर्व लोकांना गुप्ता परिवाराने लग्नाचे आमंत्रण दिले आहे. यासाठी तेथेही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सर्व पाहुण्यांना बद्रीनाथाचे दर्शन घडविण्यात येणार आहे.


  पुढील स्लाइडमध्ये पाहा.... लग्न समारंभाचे फोटो (साभार अमर उजाला)

 • Wedding Auli with exotic flowers of 5 crores for wedding
 • Wedding Auli with exotic flowers of 5 crores for wedding
 • Wedding Auli with exotic flowers of 5 crores for wedding
 • Wedding Auli with exotic flowers of 5 crores for wedding

Trending