आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाळ्यात पुन्हा 'सैराट'; महाविद्यालयीन तरूणीला पळवून मुख्याध्यापकाने केले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा- बोरगाव (ता. करमाळा) येथील सदानील एज्युकेशन ट्रस्टच्या सायन्स व कॉमर्स शाळा, बोरगाव येथील शाळेच्या मुख्याध्यापकाने बोरगाव येथील मुलीशी (वय २०) पळून जाऊन लग्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी १९ सप्टेंबर २०१८ रोजी करमाळा पोलिसांत मुख्याध्यापकासह त्याच्या आई-वडिलांवर मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मुख्याध्यापकाने २१ सप्टेंबरला लग्न करून २२ सप्टेंबरला पुरावे पोलिसांना पाठवले आहेत. 


याप्रकरणी सोमनाथ खराडे, सुरेश खराडे व लक्ष्मी खराडे संशयित म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करीत आहेत. तपास करीत असताना संबंधित मुलगी व मुख्याध्यापक सोमनाथ खराडे यांनी लग्न केल्याचा पुरावा करमाळा तसेच सोलापूर पोलिसांकडे पाठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


बोरगाव येथील मुलगी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. सोमनाथ खराडे (वय २८) रा. बोरगाव, ता. करमाळा येथील खासगी शाळा सदानील एज्युकेशन ट्रस्टच्या इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक होते. 


सोमनाथ हा मुलीच्या मागे फिरत आहे, याची कुजबूज पालकांना होती. सोमनाथला या पूर्वी ही मुलीच्या घरच्यांनी ताकीद दिली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असत. मुलीचे घरचे नेहमीप्रमाणे बोरगाव येथील राहत्या घरी झोपलेले असताना १९ सप्टेंबर रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास मुलीचे वडील उठल्यानंतर पाहिले तर मुलगी घरात नव्हती. शोधाशोध केली, पण मुलगी आढळली नाही. त्यानंतर सोमनाथ खराडे व त्याच्या आई-वडिलांनीच मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी करमाळा पोलिसांत दिली. गावातील ग्रामस्थांनी करमाळा पोलिस ठाणे परिसरात ठिय्या मांडला होता. यानंतर हवालदार विजय शेळकंदे व अनिल निंबाळकर यांना सोबत तेलतुंबडे यांनी तपास केला. त्यावेळी मुख्याध्यापक व मुलीने आपण लग्न केले असल्याचे पत्र पोलिस अधीक्षक सोलापूर तसेच करमाळा पोलिस ठाण्याकडे २२ सप्टेंबर रोजी पाठवले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...