आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षांपूर्वी हरवलेली वेडिंग रिंग सापडली, पुढच्या महिन्यात कपल साजरा करेल गोल्डन जुबली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिसबेन- ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेनमध्ये राहणारे मायकल हिल यांना आपल्या लग्नातील अंगठी 40 वर्षानंतर सापडली. ही अंगठी 40 वर्षांपूर्वी घरातील बागेत काम करताना हरवली होती. जुन्या गोष्टी शोधणारे प्लंबर जुआल बटलर यांच्या मदतीने मायकल यांना त्यांची ही अंगठी सापडली. बटलरने मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने शुक्रवारी 11 तास या अंगठीला शोधले, पण अंगठी सापडली नाही. मग, रविवारी परत त्यांनी अंगठीचा शोध घेतला आणि त्यांना जमिनीत 8 इंच खाली खोल सापडली. मायकल आणि काएने 1970 मध्ये लग्न केले होते.
मायकलसाठी ही अंगठी सापडणे यासाठीही महत्वाचे आहे, कारण पुढील महिन्यात मायकल आणि काए आपल्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरी करत आहे. 72 वर्षीय मायकलने अंगठी सापडण्याची आशा सोडली होती, पण मागच्या आठवड्यात त्यांनी आपल्या मुलासमोर या गोष्टीचा विषय काढला, तेव्हा त्यांनी जुआलचा पत्ता काढून त्याला ही अंगठी शोधालया लावली.

बातम्या आणखी आहेत...