आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘स्टार प्रवाह’च्या ‘ललित २०५’मध्ये लवकरच नील आणि भैरवीच्या लग्नाचा सोहळा पाहायला मिळणार आहे. नीलच्या लग्नाची जुळवाजुळव सुरु असतानाच नील अचानक भैरवीला घरी घेऊन आला. एवढंच नाही तर भैरवीशी लग्न केल्याचं सांगत त्याने संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाला धक्का दिला. आता मात्र आजीच्या इच्छेखातर नील आणि भैरवीच्या विधीवत लग्नाचा घाट घालण्यात आलाय. लग्नासाठी राजाध्यक्ष कुटुंबाने जोरदार तयारीही केलीय. मेहंदीपासून ते अगदी सप्तपदीपर्यंत सगळे विधी थाटात पार पडत आहेत.
आता प्रश्न आहे तो नील आणि भैरवीचं लग्न निर्विघ्न पार पडणार का? कुटुंबासाठी जरी हे दोघं सात फेरे घेत असले तरी प्रत्यक्षात मात्र या दोघांमध्ये एक कॉण्ट्रॅक्ट झालंय. तीन महिन्यांपर्यंत नवरा-बायको असल्याचं नाटक करायचं असं दोघांनी सहमताने ठरवलंय. त्यामुळे नील-भैरवीचं हे गुपित उघड होणार का? या विधीवत लग्नानंतर नील- भैरवीच्या नात्यात काय बदल होणार? राजाध्यक्ष कुटुंब भैरवीचा सून म्हणून स्वीकार करणार का? या साऱ्या गोष्टी ‘ललित २०५’च्या यापुढील एपिसोड्समध्ये पाहायला मिळतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.