आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचे फर्स्ट रिसेप्शन 21 नोव्हेंबरला बेंगळुरुमध्ये झाले. या खास प्रसंगी दीपिका आणि रणवीर खुप रॉयल लूकमध्ये दिसले. दीपिकाने आपल्या लग्नाच्या प्रसंगी आई उज्ज्वलाने दिलेली गोल्डन कलरची साडी नेसली. रिसेप्शन आणि वेडिंग सेरेमनीमध्ये दीपिकाने आईने दिलेली साडी नेसली. देशातील सर्वात प्रसिध्द डिझायनरने सांगितले की, ही साडी मी डिझाइन केली आहे, पण सत्य कळाल्यावर सोशल मीडिया यूजर्सने त्याला ट्रोल केले.
दीपिकाच्या आईने एका बुटीकमधून खरेदी केली साडी
दीपिकाच्या आईने बेंगलुरुच्या अनगाडी गॅलेरिया बुटीकमधून दीपिकासाठी ही साडी खरेदी केली होती. दीपिकाने 14 नोव्हेंबरला कोंकणी पध्दतीने झालेल्या लग्नात ही साडी नेसली होती. तिने साडीमध्ये टचअप आणि मॉडिफिकेशन करण्यासाठी ही साडी डिझाइनरला दिली होती. यानंतर डिझायनरने दीपिकाचा साडीमधील फोटो शेअर करुन याला स्वतःचे नाव दिले. तेव्हा नेटक-यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. या चुकीसाठी नंतर त्याने नेटक-याची माफीही मागितली. काही सोशल मीडिया यूजर्सने त्याच्यावर टिका केली. एका यूजरने लिहिले की, - अनगाडी गॅलेरियाला डिझायनर विरुध्द केस करायला हवी. रिसेप्शनमध्येही दीपिकाने आईने गिफ्ट केलेली साडी नेसली होती. लग्नापासून रिसेप्शनपर्यंतच्या साड्यांना डिझाइनचे नाव जोडले गेले, कारण त्याने या साड्यांना मॉडिफाय करुन फायनल टच दिला होता.
दीपिकापुर्वी कगंना, रेखा आणि श्रीदेवीने घातली आहे गोल्डन साडी
रिसेप्शनमध्ये दीपिका ज्या गोल्डन साडीमध्ये दिसली होती, तशी साडी यापुर्वी कंगना रनोट, रेखा आणि श्रीदेवीने घातली आहे. रेखा नेहमीच विविध इव्हेंटमध्ये गोल्डन साड्यांमध्ये दिसत असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.