आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीप-वीर वेडिंग / पहिल्या दिवशी व्हाइट थीममध्ये सजला होता व्हिला, दुस-या दिवशी रेड थीम आणि सिंधी पद्धतीने होणार लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः इटलीतील लेक कोमोच्या विला डेल बालबियानेलोमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाचे फंक्शन्स सुरु आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी कोकणी पद्धतीने रणवीर-दीपिका विवाहबद्ध झाले. आज  (15 नोव्हेंबर) हे दोघे सिंधी पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोन दिवस चालणा-या या लॅव्हिश वेडिंगसाठी व्हिला वेगवेगळ्या थीमवर डेकोरेट केला गेला. रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी व्हाइट थीम होती, तर 15 नोव्हेंबरच्या फंक्शनसाठी रेड थीम ठेवण्यात आली आहे.

 

व्हाइट रोज आणि वॉटर लिली : पिंकविला या एंटरटेन्मेंट साइटच्या वृत्तानुसार, व्हिलाला 8000 व्हाइट रोजेस आणि वॉटर लिलीने सजवण्यात आले आहे. हा व्हिला सजवण्यासाठी 12 आर्टिस्टच्या टीमने 16 तास मेहनत घेतली. लग्नमंडपाला वॉटर लीलीने सजवण्यात आले.

 

सिलेक्टेड गेस्ट:  लग्नात फक्त 30-40 पाहुणे सहभागी झाले आहे. पाहुण्यांसाठी ग्रॅण्ड लंचची तयारी केली गेली. स्वित्झर्लंडहून स्पेशल मिठाई मागवण्यात आली. 


रेड थीमवर होणार सजावट : दुस-या दिवशी व्हिला रेड थीमवर सजवला जाणार आहे. तर दीपिका सब्यसाचीचा डिझायनर लहेंगा परिधान करणार आहे. रणवीर सिंधी कुटुंबातून आहे. त्यामुळे दुस-या दिवशी सिंधी पद्धतीने त्यांचे लग्न लागणार आहे.  कडक सुरक्षा व्यवस्था आणि रणवीर-दीपिकाच्या स्पेशल डिमांडवर पाहुणे लग्नाचे आणि कपलचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करणार नाहीत. 

 

बातम्या आणखी आहेत...