Home | National | Gujarat | Wedding without bride, 200 guests in marriage procession, 800 people had feast

वधु नसलेले लग्न; मुलाच्या आनंदासाठी समाजची पर्वा न करता कुटुंबीयांनी उचलले हे पाऊल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 01:50 PM IST

गुजराती कुटुंबातील लग्नात मेंदी, संगीत आणि इतर सगळ्या रिती पार पडल्या

  • Wedding without bride, 200 guests in marriage procession, 800 people had feast

    हिम्मतनगर- 27 वर्षीय अजय बारोटचे आपल्या चुलत भावाने केले तसेच मोठे लग्न करण्याचे स्वप्न होते, पण बुद्धीने थोडा कमी असल्यामुळे त्याला मुलगी मिळत नव्हती. अजय जेव्हा इतरांच्या लग्नात जायचा, तेव्हा त्याची लग्न करण्याची इच्छा वाढायची. यावर तो आपल्या कुटुंबीयांशी विचारायचा, पण त्यांच्याकडे यावर कोणतेच उत्तर नव्हते. अनेक प्रयत्न करूनही अजये लग्न होत नव्हते, म्हणून घरच्यांनी वधुशिवाय त्याचे लग्न लावण्याचे ठरवले.


    लग्नाच्या एक दिवसापूर्वी मेंदी आणि संगीत प्रोग्राम झाला. यात जवळचे मित्र आणि नातलगांनी उपस्थिती लावली. दुसऱ्या दिवशी अजयला सोनेरी शेरवानी, गुलाबी फेटा घालून लग्नातील वर बनवण्यात आले. नंतर अजयला घोड्यावर बसून गावभर त्याची मिरवणुक काढण्यात आली. या वरातीत अंदाजे 200 लोक सामील होते. त्यानंतर घरच्यांनी घराजवळील मंगल कार्यालयात भाजनाची व्यवस्था केली, यात अंदाजे 800 लोक सामील झाले होते.


    समाजाविरूद्ध जाऊन मुलाचे स्वप्न पूर्ण केले
    अजयचे वडील विष्णु बारोटने मीडियाला सांगितले की,"माझा मुलगा लग्नातील चालीरितीबद्दल खूप उत्साहित होता. त्याने खूप कमी वयात आपल्या आईला गमवले होते. दुसऱ्यांची लग्न पाहून तो आपले लग्न कधी होणार असे विचारायचा, त्यावेळी आमच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. त्याला स्वतःचे लग्न अनुभवायचे होते. त्याला कोणतीच मुलगी मिळत नव्हती, म्हणून आम्ही वधुविना लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता तो खूप खुश आहे, त्यामुळे मला समाज काय म्हणेल त्याची मला पर्वा नाहीये."

Trending