राशिफळ / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

बुधवारचे राशिफळ : मे महिन्यातील पहिल्याच दिवशी 12 पैकी 5 राशींवर भारी राहतील मीन राशीतील तीन ग्रह, धनहानी आणि वाद होण्याची शक्यता

रिलिजन डेस्क

May 01,2019 12:00:00 AM IST


आज 1 मे 2019 रोजी मीन राशीमध्ये तीन ग्रह बुध, शुक्र आणि चंद्र राहतील. बुध आणि शुक्र, चंद्राला आपला शत्रू मानतात. यामुळे या ग्रहांच्या प्रभावाने चंद्र पीडित झाला आहे. ग्रहांची ही अशुभ स्थिती पाच राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत अन्यथा नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : जमेची बाजू भक्कम असली तरी आज अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे. एखादी सुरक्षित गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने फायद्याची राहील. व्यस्त दिवस. शुभ रंग : राखाडी | अंक : ७मकर : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना कॉल्स येतील. आज काहीजणांना अचानक प्रवास घडण्याचे योग आहेत. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. शुभ रंग : नारिंगी | अंक : २वृषभ : व्यवसायातील उलाढाल वाढेल. शेअर्स बाजारातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुम्ही म्हणाल ती पूर्व. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९वृश्चिक : उच्चशिक्षितांना नव्या नोकरीच्या संधी खुणावतील.वेळीच घेतलेले निर्णय भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरतील. काहीजणांचा गूढ शास्त्रांकडे ओढा राहील. शुभ रंग : पांढरा| अंक : १तूळ : नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच उलाढाली कराव्यात. अती आक्रमकतेने निराशाच पदरी पडेल. आज संयम फार महत्वाचा राहील. शुभ रंग : जांभळा| अंक : ५धनू : बांधकाम व्यावसायिकांसाठी आज विषेश अनुकूल दिवस आहे. जागेच्या खरेदीसाठी कर्जमंजूरी होईल. आज तुम्ही मुलांचे हट्ट हौशीने पुरवणार आहात. शुभ रंग : हिरवा| अंक : ३कर्क : सरकार दरबारी रखडलेली कामे वशिल्याशीवाय होणार नाहीत. घरातील वृध्दांची मने सांभाळावी लागतील. संध्याकाळी सत्संगाकडे पाय वळतील. शुभ रंग : पांढरा | अंक : ४कन्या : तुमचे मनोबल वाढेल, कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवनांत सौख्य व समाधान राहील. प्रकृती उत्तम साथ देईल. शुभ रंग : मरून | अंक : ३मिथुन : आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. तुमची कामातील निष्ठा पाहून अधिकारी वर्ग प्रभावीत होईल. आज कुटुंबास वेळ देणे कठीण होईल. शुभ रंग : मोतिया | अंक : ८मीन : आज तुम्ही जरा लहरीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून न घेता आपलेच घोडे पुढे दामटवाल. तुमच्या अतीस्पष्ट बोलण्याने आपलीच माणसे दुखावतील. शुभ रंग : तांबडा | अंक : ६कुंभ : व्यवसायात आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. गृहीणींना आज अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. शुभ रंग : पिवळा| अंक : १सिंह : जे काही कराल ते तब्येतीस जपून करा. आज एकावर विसंबून दुसऱ्यास शब्द देवू नका. मोठे आर्थिक व्यवहार टाळा. विवाह जुळवण्या विषयी बोलणी आज नकोत. शुभ रंग : क्रिम | अंक : ६
X
COMMENT