Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

रिलिजन डेस्क, | Update - Jul 10, 2019, 12:15 PM IST

दोन शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस आजचा

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    बुधवार 10 जुलै रोजी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा आणि सिद्ध नावाचे 2 शुभ तयार करत आहे. या 2 शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : ६
    आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळा.

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
    व्यावसायिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आज काबाड कष्टांशिवाय पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. हितशत्रू मित्रांमध्येच लपले असण्याची शक्यता आहे.

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : ७                                                                           आवक पुरेशी राहील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणिय फरक दिसून येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी वाटेल.  गर्भवतींना आज सुदृढ संततीचा लाभ होईल. 

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८                                                              
    मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे. 

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : शुभ रंग :अबोली |अंक : २                 
    अथक  परिश्रमांच्या जोरावर ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. आज महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे.   

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : शुभ रंग : मोरपंखी |अंक : ४                                        
    अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासाल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ३
    आज तुम्हाला संयमाची गरज असून अती उत्साहाच्या  घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहावे.  

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ५
    आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहीणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी.  

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    धनू :  शुभ रंग : निळा | अंक : २
    एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने तुम्ही म्हणाल ती पूर्व.

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    मकर : शुभ रंग : केशरी | अंक : १
    तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील.

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५
    कर्यक्षेत्रात नवे डावपेच लढवावे लागतील. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांच्या मागेपुढे करावेच  लागणार आहे.विरोधकांना आज चहा पाजून आपलेसे करावे लागेल.

  • wednesday 10 july 2019 daily horoscope in Marathi

    मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
    आज काही क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नको. 

Trending