आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

बुधवार 11 डिसेंबरला रोहिणी नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. बुधवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • मेष: शुभ रंग : मरून | अंक : १

आनंदी व उत्साही दिवस. खिशात पैसा खेळता राहील.काही नवे हितसंबंध जुळतील. आज वाणीवर मात्र लगाम असणे अत्यंत गरजेचे राहील. शेजारी वाद शक्य. 

 • वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ३

स्वभावातील लहरीपणास आवर घालून संयमाने वागणे गरजेचे आहे. स्पर्धकांवर मात करण्यासाठी अविश्रांत परिश्रम  अवश्यक  आहेत. जोडीदार समजूतीने घेईल.

 • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २

बेकायदेशीर कृत्यातून त्रास संभवतो. नाकासमोर चालणेच हिताचे राहील. वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत रहा. नोकरीधंद्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल नाही.  

 • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

व्यवसायात काही नव्या संधी चालून येतील. एखादा नव्या विषयात गोडी निर्माण होईल. गृहीणी साैंदर्याची तसेच फिटनेस ची काळजी घेतील. उत्साही दिवस.

 • सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ६

कार्यक्षेत्रात वरीष्ठंवर तसेच सहकारी वर्गावर तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. आज भावनांच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. मित्रांना दूर ठेवा. 

 • कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ५

उद्योग व्यवसायात काही कायदेशीर कटकटींना तोंड द्यावे लागणार आहे. सार्वजनिक कामे करणाऱ्यांना लोकप्रियता मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल. 

 • तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

आज काही क्षुल्लक कारणाने वैवाहीक जिवनांत भांड्याला भांडे लागण्याची शक्यता आहे. आज गरजे पुरतेच बोलणे हिताचे. जिभेवर ताबा असूद्या. 

 • वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९

वैवाहीक जिवनांत आनंद द्विगुणीत करणारी घटना घडेल. नवे  स्नेहसंबंध जुळतील. नाती  जपण्यासाठी खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे हिताचे राहील. 

 • धनू : शुभ रंग : निळा | अंक : ८

जे चालंलंय ते बरं चालंलंय. मोहापसून दूूर रहा.प्रतिष्ठेस  जपणे  गरजेचे  आहे. वाहन  सुरक्षित  चालवा. विवाह  जुळवण्या  विषयी  बोलणी उद्यावर ढकला. 

 • मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : २

परिवारात आनंदी घटनांनी खेळीमेळीचे वातावरण राहील. अनेक दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावणे  तुमच्या  हाती आहे. खेळाडूंनी सराव वाढवावा.  

 • कुंभ : शुभ रंग : लाल | अंक : ३

योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे यशाकडे तुमची वाटचाल चालू राहील. मनाजोगत्या घटना मानसिक प्रसन्नता  वाढवतील. कलाकारांना स्ट्रगल करावी लागेल. 

 • मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : १

लेखन, पुस्तक प्रकाशन तसेच जाहिरातीच्या क्षेत्रात अनुकूलता राहील. साहित्यिक, कवी यांना वाचकवर्ग मिळेल. कोणतेही गैरव्यवहार मात्र टाळायला हवेत.  

बातम्या आणखी आहेत...