आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

बुधवार 11 मार्च रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...


मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : २
आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.


वृषभ : शुभ रंग : क्रिम | अंक : ४
आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील.


मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.


कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : १
नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांशी नमते घ्यावे. कुटुंबातील सदस्यांची नाराजी पत्करावी लागेल.वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.


सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.


कन्या : शुभ रंग :हिरवा| अंक : ४
आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका. ववाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या.


तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ७
अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखाल. कलाकारांचा विदेशी नावलौकिक.


वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ५
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस.


धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ८
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घाला.


मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६
कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.जे आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.


कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकणे गरजेचे आहे. आज स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या.


मीन : शुभ रंग : लेमन | अंक : १
अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

बातम्या आणखी आहेत...