Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 12:05 AM IST

दिवसाची सुरुवात होत आहे अशुभ योगाने, परंतु लगेच सकाळी 6 पासून सुरु होणार शुभ योग, 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील लाभाचा

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    बुधवार, 12 जून 2019 च्या दिवसाची सुरुवात व्यतिपात नावाच्या अशुभ योगाने होत आहे. हा योग सकाळी 6 वाजून 8 मिनिटांपर्यंत राहील. या योगामध्ये मंगलकार्य वर्ज्य सांगण्यात आले आहेत. त्यानंतर वरियान नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ५
    आज तुम्ही सर्वप्रथम कर्तव्यास प्राधान्य द्याल. काही घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. आईच्या प्रकृतीची विचारपूस करा.  प्रिय मित्रांचा सहवास लाभणार आहे.  

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
    व्यवसायात उत्तम आर्थिक लाभ होतील. आलेल्या सुसंधींचा सकारात्मकतेने वापर कराल. आज काही गरजू मित्रांच्या कामी याल. परोपकार कराल. 

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
    कार्यक्षेत्रात अनुभवींचे सल्ले डावलू नका. आपली  मते इतरांस पटणार नाहीत. मित्र अपेक्षित सहकार्य करतील. कर्ज हप्ते फेडावे लागतील. झटपट लाभाचा मोह टाळा. 

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : २ 
    आज कार्यक्षेत्रात अतिरीक्त जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नसली तरी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस आज नक्की यश मिळेल. 

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६   
    महत्वाचे निर्णय भावनेच्या भरात घेऊन चालणार नाहीत. वैवाहीक जिवनांत जे चालंलय ते बरं चाललंय. फार अपेक्षा नकांत. तरुणांनी प्रेम डोळसपणे करावे.   

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    धनू :  शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
    आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणार अहात. थोरांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. आज तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. 

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    मकर : शुभ रंग : अबोली | अंक : ५
    उद्योग धंद्यातील मंदीने नैराश्य येईल. नोकरदारांनी कामाच्या ठीकाणी सतर्कता बाळगावी. हितशत्रू आज मित्रांमधेच लपले असण्याची शक्यता आहे.  

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ: शुभ रंग : भगवा | अंक : ७
    आर्थिक बाजू भक्कम असल्याने मोठया खरेदीचे बेत  आखता येतील. गृहीणी आज घरसजावटीचे मनावर घेतील. मुले अभ्यासा व्यतिरीक्त सर्व काही करतील. 

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
    आज अत्यंत आनंदी व उत्साही दिवस अाहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटल्याने दीर्घकाळ रखडलेली कामेही पूर्ण होतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.   

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ४ 
     कार्यक्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल राहील. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय अचूक  ठरतील. 

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    कर्क :  शुभ रंग : हिरवा | अंक : १
    मनोबल कमी असून नकारात्मक मन:स्थिती असेल. वडीलधारी मंडळी उपदेशांचे डोस पाजून बोअर करतील. आज दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील. 

  • wednesday 12 june 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : शुभ रंग : पिवळा | अंक : ४
    असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे आहे. संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. अती स्पष्ट स्वभावामुळे काही नाती दूरावतील. कमीच बोला.

Trending