Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Wednesday 12 September rashibhavishya in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 12, 2018, 12:01 AM IST

आज गुरुवार 12 सप्टेंबरला भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील तृतीया असून हरितालिका व्रत आहे.

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  आज गुरुवार 12 सप्टेंबरला भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील तृतीया असून हरितालिका व्रत आहे. सूर्योदय चित्रा नक्षत्रामध्ये होत असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावामुळे 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. घर-कुटुंबात सुख-शांती राहील तसेच आनंदाची बातमी कळेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये उत्पन्न वाढेल. या व्यतिरिक्त इतर 3 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


  मेष -
  पॉझिटिव्ह -
  मनामध्ये चालू असलेली चलबिचल आज संपून जाईल. रागावर नियंत्रण ठेवावे. एखादे बिघडलेले काम आज पूर्ण करू शकता. जबाबदारीने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मेहनतीने यश प्राप्त होईल. एखादे नवीन काम सुरु करण्यापूर्वी नियमित कामावर लक्ष द्यावे. शक्य असेल तेवढे सहयोगाने काम करण्याची तयारी ठेवा. सामाजिक कार्यातही सक्रिय राहाल. मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. एखादा नवीन प्रेम प्रसंग सुरु होण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये मोठा फायदा होऊ शकतो.


  निगेटिव्ह - गंभीर गोष्टींमध्ये अडकू नका. एखाद्या कारणामुळे गैरजमज होऊ शकतो. तुम्हाला परिस्थिती जशी वाटत आहे तशी नाहीये. काम पूर्ण होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. व्यर्थ खर्चाचे योग जुळून येत आहेत.


  काय करावे - मुळा खावा.


  लव्ह - पार्टनरसोबत दिवस व्यतीत करावा. पार्टनरकडून सन्मान आणि प्रेम मिळेल.


  करिअर - कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये यश आणि फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना सहजपणे यश प्राप्त होईल.


  हेल्थ - मानसिक अशांती आणि तणाव वाढेल. थकवा आणि आळसामुळे त्रस्त राहाल.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  वृषभ 
  पॉझिटिव्ह -
  तुमच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ शकतात. तुमचा मूडही सारखा बदलत राहील. धन लाभाचा योग आहे. चंद्र गोचर कुंडलीच्या पाचव्या स्थानी राहील. कुटुंब आणि सोबत काम करणाऱ्यांबरोबर समाजाचे सहकार्य लाभेल. परिश्रम आणि ओळखीमुळे कामे पूर्ण होतील. एकूण दिवस ठीक आहे. 


  निगेटिव्ह - आरोग्याबाबत थोडे सावध राहा. कायदेशीर, राजकीय लेखन आणि प्रकाशनाच्या कामात यश मिळण्याची अपेक्षा कमीच आहे. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. व्यसनांपासूनही दूर राहा. 


  काय करावे - अपोझिट जेंडरच्या व्यक्तींना चॉकलेट खाऊ घाला. 
   

  लव्ह - पार्टनरबरोबर फिरायला जाऊ शकता. एकमेकांना वेळ द्याल. 


  करिअर - भागीदारीच्या व्यवसायाच फायदा कमीच मिळू शकेल. तुम्हाला सावध राहावे लागेल. कॉमर्स फील्डच्या विद्यार्थ्यांना परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. 


  हेल्थ - आरोग्यात चढ उतार येऊ शकतात. बेजबाबदारपणा करू नका. 

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  मिथुन  - 
  पॉझिटिव्ह
  - नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित नवीन गोष्टी आज तुम्हाला समजू शकतात. इनकम, खर्च, कुटुंब आणि प्रोफेशनल जीवनात संतुलन कायम ठेवावे. इतरांचे कौतुक करावे आणि मनमोकळी चर्चा करावी. यामुळेच तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी पुढे जाण्याची संधी मिळेल. कुटुंबाचे पूर्ण समर्थन आज मिळेल. मनोरंजन आणि रोमान्सची संधी मिळेल. तुमची सामाजिक स्थितीही चांगली राहील.


  निगेटिव्ह - एखाद्या गोष्टीची आज कमतरता जाणवेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल परंतु शरीर साथ देईल काही नाही यात शंका आहे. परिस्थिती तुमच्या फेव्हरमध्ये राहणार नाही. इतरांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. प्रत्येक गोष्टींवर कमेंट करू नये. पैसे जेवढा येईल तेवढा खर्च होईल. आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.


  काय करावे - हनुमान मंदिरात रेशमी धागा दान करावा.


  लव्ह - या राशीच्या प्रेमात पडलेल्या लोकांनी सावध राहावे. प्रेम प्रस्ताव अमान्य होऊ शकतात.


  करिअर - आज व्यवसायात व्यस्त राहाल. अधिकारी तुमच्या गोष्टींना महत्त्व देतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला मदत मिळेल.


  हेल्थ - सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. 

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  कर्क -
  पॉझिटिव्ह
  - आज तुम्ही व्यावहारिक राहाल. काही खास लोकांचे लक्ष तुमच्यावर आणि तुमच्या कामकाजावर राहील. मोठे निर्णय विश्वासार्ह्य लोकांचा सल्ला घ्या. विचारपूर्वकच पुढे जा. नात्यांमध्ये निर्माण झालेला वाद संपुष्टात येऊ शकतो. गुंतवणूक किंवा खरेदीचा निर्णय चौकशीनंतरच घ्या. तुम्ही तुमच्या बोलण्याच्या शैलीने कुणालाही सहमत करु शकता. केलेल्या कामामुळे तुम्हाला पूर्ण फायदा आणि यश मिळू शकते. धैर्य आणि संयम राखा. कुटुंबातील अडचणी दूर होतील.


  निगेटीव्ह -  काही लोक तुमच्याविषयी वाईट बोलतील आणि तुमच्या कामात दोष काढण्याचा प्रयत्न करु शकतात. तुमच्या कामात कुणीही चूक काढू शकणार नाही, याकडे लक्ष द्या. एखादा चुकीचा निर्णय घेण्याची आज शक्यता आहे. जास्त पैसा खर्च होऊ शकतो. सावध राहा. 


  काय करावे  - एखाद्या ब्राह्मणाला जान्हव दान करा.  


  लव्ह- जोडीदाराकडून आज तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकेल. प्रेमसंबंध मजबूत होतील.

   
  करिअर- कार्यक्षेत्रात आज जास्त काम करावे लागेल. व्यवसायात वडिलांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा मेहनतीचा काळ आहे. 

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  सिंह
  पॉझिटिव्ह -
  नोकरीत अतिरिक्त जबाबदारी आपल्याला मिळू शकते. नोकरीशी संबंधित फायद्याचे संकेत मिळतील. कुठल्याही समस्येला मोठी समजू नका. एखादे आव्हान आपल्यासाठी संधी घेऊन येऊ शकते. लोकांना आपले विचार पटवून देण्यात यशस्वी ठरू शकता. दुसऱ्यांना मदत होईल असे एखादे काम आपल्याकडून होऊ शकते. नवीन लोकांशी मैत्री होऊ शकते. चंद्राच्या प्रभावातून आपल्याला धन लाभ होऊ शकतो. शत्रू आपल्याला त्रास देऊ शकणार नाहीत. मित्रांसोबत वेळ जाईल. 


  निगेटिव्ह - भीतीवर नियंत्रण ठेवावा लागेल. काहीशी गुंतागुंत होऊ शकते. आपले रहस्य समोर येऊ शकतात. वाहनापासून सावध राहा. जखमी होऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात अती उत्सफूर्तपणे काम केल्यास नुकसान होऊ शकते. 


  काय करावे - घर किंवा कार्यालयात स्वच्छतेसाठी जुन्या झाडूचा वापर करू नका.


  लव्ह - पती-पत्नीमध्ये गैरसमज दूर होऊ शकतात. दांपत्य जीवनात सुख वाढू शकतो. 


  करिअर -  आर्थिक व्यवहारांसाठी दिवस काहीसा अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी वेळ नकारात्मक ठरू शकते. 


  हेल्थ - वडिलांच्या आरोग्य संदर्भात चिंता वाढू शकते. आपले आरोग्यही बिघडण्याची शक्यता आहे. सांभाळून राहावे लागेल. 

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  कन्या 
  पॉझिटिव्ह -
  यशाचा विचार करता दिवस ठिक असेल. नवीन काम सुरू करण्यासाठी आणि सोडवण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नव्या नोकरीच्या ऑफर मिळाल्या तर त्याचा संपूर्ण व्यावहारीक दृष्टीकोनातून विचार करा. बिघडलेली कामे पुन्हा व्यवस्थित करण्यात शक्ती आणि वेळ जाईल. उत्साह, परिश्रम आणि आत्मविश्वासाने काम करा. बिघडलेले संबंध सुधारू शकतात. 


  निगेटिव्ह - आराम करण्यासाठी वेळ मिळणार नाही. एखाज्या कामासाठी जास्त हट्ट करू शकता. त्यामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. प्रियकरावर पैसे खर्च होऊ शकतात. मनातील बोलण्यात संकोच वाटू शकतो. त्यामुळे सावध राहावे लागेल. कोणी तुम्हाला चिथावणी देण्याचे कामही करू शकते. मानसिक अस्थिरतेपासून वाचावे लागेल. विचलित न होता वेळेवर काम करण्याचा प्रयत्न करा. 
   

  काय करावे - पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. 


  लव्ह - पार्टनरचा मूड चांगला राहणार नाही. वाद होऊ शकतात. 


  करिअर - खर्च वाढू शकतो. जॉब आणि बिझनेसमध्येही पैसा गुंतू शकतो. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. 


  हेल्थ - गळ्याचे रोग उद्भवू शकतात. इन्फेक्शनही होऊ शकतो. 

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  तूळ - 
  पॉझिटिव्ह -
  शांत डोक्याने काम करा. परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे लागेल. आत्मविश्वास वाढेल. मनातील गोष्ट सांगण्यास उत्सुक राहाल. कोर्ट-कचेरीची कामे पूर्ण कराल. जुन्या मि‍त्रांच्या गाठी भेटी होतील. कौटुंबिक समस्या सोडवाल. शेती, घराच्या याचिका निकाली निघतील. 


  निगेटिव्ह - मनोरंजनावर खर्च करावा लागेल. मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी‍‍त प्रमोशन मिळेल. गोचर कुंडलीत बाराव्या स्थानी चंद्र असल्याने धावपळ होईल. वरिष्ठ अधिकारी, मालकासोबत वाढ होण्याची शक्यता आहे. अडचणी वाढतील. प्रवासात वायफळ खर्च होईल. 


  काय करावे - तुळससमोर तूपाचा दिवा लावावा. 


  लव्ह - तुळ राशीच्या प्रेमीयुगुलांसाठी आज अशुम दिवस आहे. जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता आहे.


  करिअर - काही प्रकरणात नशीब साध देईल. खूप परिश्रम घ्यावे लागतील. कोर्ट-कचेरीतील निकाल तुमच्या बाजुने लागतील. विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा लागेल. 


  हेल्थ - प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. झोप कमी होईल.

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  वृश्चिक 
  पॉझिटव्ह -
  रोजची आणि गरजेची काम आज पुर्ण करुन घेणे तुमच्यासाठी सोयीस्कर राहिल. चंद्र गोचर कुंडलीच्या लाभ स्थानात आहे. यामुळे तुमचे इनकम वाढण्याचे योग आहेत. कामासाठी किंवा ऑफिसमध्ये अचानक घडलेल्या काही गोष्टींमुळे प्रवास करण्याचा योग आहे. काही नवीन शिकण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. कौटूंबिक जबाबदारी वाढू शकते. लोकांकडून मदत मिळेल. गरजू लोकांची मदत करा. पैसा आणि महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. संपत्तीसंबंधीत कामांसाठी दिवस अनुकूल असू शकतो.


  निगेटिव्ह - मैत्रीमध्ये जास्त वेळ खराब करु नका. तुम्हाला सावध राहावे लागेल. तुमचे रहस्य कुणासोबतही शेअर करु नका. जास्त कर्ज घ्यावे लागेल, असे कोणतेही काम सुरु करु नका. नको असलेले वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर कर्ज घेऊ नका. एखादा जुना रोग तुमच्या अडचणी वाढवू शकतो. संधीवात किंवा वायु रोग होऊ शकतात. 


  काय करावे - ऑफिसमध्ये किंवा गाडीवर बसताना सीटवर लाल कापड टाकून बसा. 


  लव्ह - जोडीदार तुमची मदत करु शकतो. पार्टनरसोबत आपल्या मनातील गोष्टी शेअर करा.


  करिअर - आज तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वेळ तुमच्या बाजूने असेल. विद्यांर्थ्यांचे टेंशन आज वाढू शकते. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.


  हेल्थ - थकवा आणि आळस वाढू शकतो. मानसिक तणावामुळे त्रास होऊ शकतो.

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  धनु
  पॉझिटव्ह -
  खास कामं पुर्ण करण्याची प्लानिंग करा. कामात मन लागेल. विचार करुन बोलाल, यामुळे कोणत्याही अडचणीत अडकणार नाही. प्रेमी, जीवनसाथी किंवा इतर महत्त्वाच्या नातेवाईकांसाठी वेळ काढावा लागू शकतो. दुस-याची मदत केल्यानेही तुमची नियोजित कामं पुर्ण होतील. तुम्हाला येणा-या दिवसात फायदा देणारा प्लान तुम्ही करु शकता. 


  निगेटिव्ह - काही चुकांमुळे तुम्ही टेंशनमध्ये येऊ शकता. गोचर कुंडलीतील सहाव्या स्थानातील चंद्र तुमच्यासाठी थोडा कठोर आणि त्रासदायर ठरु शकतो. तुमचा खर्च वाढू शकतो. आज तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. वाहनांपासून सावध राहा. आजचा दिवस आव्हानात्मक राहिल. 


  काय करावे - एकत्र काम करणा-या लोकांवर आणि भाऊ-बहिणींवर रागावू नका. मित्रांसोबत संयमाने राहा. 


  लव्ह - पार्टनरकडून सहयोग मिळू शकतो. पार्टनरसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. 


  करिअर - बिझनेस करणा-या लोकांनी आज उधार देवाण-घेवाण करु नये. नोकरी करणारे लोक अधिका-यांमुळे त्रस्त राहतील. अभ्यासावर लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली आहे. 


  हेल्थ  - आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. जुन्या रोगांमुळे त्रास होऊ शकतो. 

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  मकर 
  पॉझिटिव्ह -
  आज तुम्ही कोणतीही गोष्ट मनात ठेऊ नका. कोणत्या न कोणत्या प्रकारे केलेल्या कामांचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. पैशांच्या स्थितीत सुधार आणण्यासाठी तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. बेरोजगार असाल तर योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तिचा सल्ला घ्यावा लागेल. प्रेमात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यावसाच्यात तुमची जबाबदारी वाढू शकते.


  निगेटिव्ह - आपल्या कामात कमी आणि दुसऱ्याच्या कामात जास्त व्यस्त होणे टाळा, यामुळे तुमचे इतर महत्वाचे काम अर्धवट राहू शकतात. एखाद्या गोष्टीची कमी आज तुम्हाला जाणवू शकते. तुमच्या मुडमध्ये बदल देखील होऊ शकतो. काही प्रकरणात जिवनसाथीचा मुड देखील खराब होऊ शकतो. कुटुंबाच्या अडचणींमुळे तणाव वाढू शकतो.


  काय करावे - तुळशीवृंदावनात थोडे पाणी टाकून नमस्कार करा.


  लव्ह - प्रेमातील पार्टनरकडून सहकार्य आणि पैसे मिळू शकतात. वैवाहिक जीवनात सुख ठेवण्यासाठी पार्टनरपासून कोणतीही गोष्ट लपवू नका.


  करिअर - बिजनेसमध्ये योजना आखू शकता. देणे-घेण्यात फायदा होईल. तुमची जबाबदारी वाढू शकते. विद्यार्थी आपली मेहनत आणि मिळालेल्या यशातून थेडे असंतुष्ट होऊ शकतात.


  हेल्थ - डोकेदुखी आणि अंगदुखी होण्याची शक्यता आहे. डोळ्यात जळजळ किंवा अॅलर्जी देखील जाणवू शकते.

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  कुंभ - 
  पॉझिटिव्ह -
  दिवस सामान्य असेल. तुम्ही केलेल्या कामाची प्रशंसा होईल. तुम्ही नवीन नोकरी सुरू केली आहे किंवा एखादे नवे काम हाती घेतले आहे, तर तुम्हाला अधिक काम करावे लागेल. आपली एखादी माहिती किंवा ओळखीने तुम्ही सोबत असणाऱ्याची मदत करु शकतात. तुम्ही तुमची प्लॅनिंग गुप्त ठेवाल.


  निगेटिव्ह - आज नशिबावर बिलकूल अवलंबून राहु नका. अचानक धन हानी होण्याची शक्यता बनत आहे. आज तुम्हाला सावधान राहावे लागेल. कोणाला उधार पैसे देऊ नका नाहितर पैशांची गुतांगुंत होऊ शकते. सावधान राहा अन् ध्यान असू द्या, दुसऱ्यांच्या कामामध्ये दखल देऊ नका. काही काम इच्छा नसतानाही कुछ तुम्हाला जबरदस्ती करावे लागु शकतात.


  काय कराल - पाणी पिण्यासाठी स्टील किंवा एखाद्या धातुच्या ग्लासचा उपयोग करा.


  लव्ह - जोडीदारसोबत वेळ घालाल. आज तुम्ही फिरायलाही जाऊ शकतात. 


  करिअर - कार्यक्षेत्रामध्ये सोबतच्या लोकांकडून मदत न मिळाल्यामुळे तुम्ही दु:खी राहु शकतात. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांनी काहीसा आळस आणि थकवा जाणवेल


  हेल्थ - पोट बिघडू शकते. सावधान राहा.

 • Wednesday 12 September rashibhavishya in marathi

  मीन -
  पॉझिटिव्ह - दैनंदिन जीवनातील कामे सहकार्यातून पूर्ण कराल. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याचे योग. करिअरबाबत मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. अनेक लोक तुमचे मार्गदर्शन घेतील. जुने वाद संपुष्ठात येतील. मूड चांगला राहील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आवकही चांगली राहील. रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.  


  निगेटिव्ह - सोबत राहाणारे आणि काम करणार्‍यांवर विश्वास ठेवू नका. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. बचत संपुष्‍ठात येईल. तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते. 


  काय करावे - नदी, तलाव किंवा समुद्र किनार्‍यावरील एखाद्या मंदिरात तूपाचा दिवा लावावा.


  लव्ह - जोडीदाराकडून खूशखबर मिळेल. सामाजिक कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी व्हाल.


  करिअर - बिझनेस तसेच कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नव्या ओळखी होतील. जास्त परिश्रम घ्यावे लागतील.


  हेल्थ - आरोग्य उत्तम राहील. प्रसन्न आणि चैतन्य राहील. 

Trending