आजचे राशिभविष्य : / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

बुधवारचे राशिफळ : आज ब्रह्मा आणि इंद्र नावाचे दोन शुभ योग, 12 पैकी या 8 राशीच्या लोकांना दिवसभरात होतील विविध लाभ, नशिबाची मिळू शकते साथ, चार राशीच्या लोकांनी राहावे सावध  

Feb 13,2019 12:00:00 AM IST

बुधवार 13 फेब्रुवारी रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा आणि इंद्र नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : उद्योग व्यवसायात केलेले कष्ट कारणी लागतील. नवीन व्यावसायिकांना आशेचा किरण दिसेल.काही दूरावलेली नाती जवळ येतील. शब्द जपूनच वापरा. शुभ रंग : तांबडा | अंक : ६वृषभ : महत्वाच्या चर्चेत समोरचा काय म्हणतो ते नीट ऐकून घ्या. उगीच आले मत मांडण्याची घाई करू नका. आज सत्संगात राहून मानसिक बळ वाढेल. शुभ रंग : हिरवा | अंक : ८मिथुन : आज काही दूरचे नातलग संपर्कात येतील. तुमची परसपोर्ट वीजा संबंधीत कामे यशस्वी होतील. आज एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधलीत तर सापडेल. शुभ रंग : क्रिम | अंक : १कर्क : नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टांचे चीज होईल.आर्थिक अडचणी नाहीशा होतील. विवाहेच्छूकांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज इच्छापूर्तीचा दिवस. शुभ रंग : जांभळा | अंक : ९सिंह : कार्यक्षेत्रात स्वत:चे महत्व सिध्द करता येईल. आज अधिकार गाजवायची संधी मिळेल. काही अटीतटीच्या प्रसंगांना धैर्याने तोंड द्याल. विरोधक नमते घेतील. शुभ रंग : सोनेरी | अंक : ४कन्या : व्यावसायिक उलाढाल जरा संथच राहील. काही मनाविरूध्द घटना मन:स्वास्थ्य बिघडवतील.ज्येष्ठांनी मानसिक शांतीसाठी उपासनेत खंड पडून देऊ नये. शुभ रंग : पिस्ता| अंक : २तूळ : हाती असलेला पैसा जपून वापरायला हवा. दुपारनंतर काही अत्यावश्यक खर्च उभे राहणार आहेत. आज कामगार वर्गाने आधी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५वृश्चिक : कार्यक्षेत्रात जपूनच पावले टाका. आज कुठेही शक्यतो वादविवाद टाळा. सामंजस्यानेच कामे होतील. पत्नीच्या सल्ल्याने वागण्यातच हित आहे. गुपिते उघड करू नका. शुभ रंग : जांभळा | अंक : ४धनू : काही डोक्यास ताप देणारी मंडळी भेटणार आहेत. आपले मानसिक संतूलन ढळून देऊ नका. अन्यथा विरोधकांना आयती संधी मिळेल. संयमाची गरज. शुभ रंग : लाल | अंक : ७मकर : आर्थिक चणचण असेल तर दुपारनंतर निश्चितपणे दूर होईल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून पालकांचा उत्साह वाढेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. शुभ रंग : डाळींबी | अंक : ९कुंभ : कलाकारांना स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे.धंद्यातील पूर्वीची तत्व बदलावी लागतील. अाज गृहीणींना सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा असेल. शुभ रंग : निळा | अंक : ६मीन : दैनंदीन कामे कंटाळवाणी वाटतील. काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. आज वेळप्रसंगी लहान भाऊही योग्यच सल्ला देतील. शेजारी प्रमाने डोकावतील. शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
X