Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

दिव्य मराठी | Update - Mar 13, 2019, 12:00 AM IST

बुधवार राशीफळ : आज जुळून येणार एक शुभ आणि एक अशुभ योग, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहणार बुधवार...

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  बुधवार 13 मार्च रोजी रोहिणी नक्षत्र आणि इतर ग्रह-स्थितीमुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर प्रीती नावाचा शुभ योग तयार होता आहे. एक शुभ आणि एक अशुभ योगामुळे आजचा दिवस काही राशींसाठी लाभ करून देणारा तर काहींसाठी अडचणींचा ठरू शकतो. कोणत्या ना कोणत्या अडचणीत असतील. याव्यतिरिक्त अन्य ग्रहांचा संमिश्र प्रभाव राहील.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  मेष : आज इतरांना तुमच्या लहरीपणाचा प्रत्यय येईल.अती स्पष्ट बोलण्याने काही आपलीच माणसे दुखावली जातील. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवणे गरजेचे.  शुभ रंग : तांबडा | अंक : ९

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  वृषभ : संमिश्र फळे देणारा दिवस. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे लक्षात असूद्या. महत्वाचे निर्णय विचारांती घेणे गरजेचे आहे. वैवाहीक जोडीदाराची मते समजून घ्या. शुभ रंग : हिरवा | अंक : ७

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  मिथुन : आज आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. झटपट लाभाचा मोह टाळायलाच हवा. वैवाहीक जिवनातील वाद फार ताणू नका. प्रवास सुखावह होतील. शुभ रंग :नारिंगी | अंक : ६

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  कर्क : कितीही वाढता खर्च असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून आज तुम्ही जी म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल.  शुभ रंग : पिवळा | अंक : ४

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  सिंह : आज फक्त आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. तुमच्या कामातील निष्ठेने आज तुम्हाला कुटुंबियांची नाराजी मात्र पत्करावी  लागेल.  शुभ रंग : क्रिम | अंक : २

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  कन्या : नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक धाडस करावे. अती आक्रमकतेने निराशा पदरी पडण्याची शक्यता.  संयमाची गरज आहे.  शुभ रंग : राखाडी | अंक : ९

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  तूळ : आज जे काही कराल ते करताना आधी प्रकृतीस जपा. एकावर विसंबून दुसऱ्यास अश्वासने देऊ नका. आज मोठया आर्थिक उलाढाली टाळलेल्याच बऱ्या. शुभ रंग : निळा| अंक : ८

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक : आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात उभी असलेली नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवनांत सौख्य आणि समाधान राहील. शुभ रंग : लाल| अंक : ९

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  धनू : ज्येष्ठ मंडळींनी प्रक़तीकडे दुर्लक्ष करू नये. श्वसनाचे विकार असतील तर विषेश काळजी घ्यावी. येणी असतील तर वसूल होऊ शकतील. शुभ रंग : आकाशी| अंक : ७

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  मकर : व्यावसायिक उलाढाल वाढेल. शेअर्स बाजारातील तुमचे अंदाज योग्यच ठरतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. यशदायी दिवस.  शुभ रंग : केशरी| अंक : ५ 

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  कुंभ : बांधकाम व्यावसायिकांसाठी आज विषेश अनुकूल दिवस आहे. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. मुलांना दिलेले शब्द पाळल. गृहसौख्याचा दिवस.  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३    

 • wednesday 13 march 2019 Daily horoscope in Marathi

  मीन : आज काही मनाजोगत्या घटना घडतील. भावंडांतील कटूता दूर होऊन सलोखा निर्माण होईल. बेरोजगारांना रोजगार प्राप्ती होईल.  आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.  शुभ रंग : पांढरा | अंक : १   

Trending