आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

बुधवार 15 जानेवारी आज मकरसंक्रांती आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • मेष: शुभ रंग : मरून | अंक : १

नवीनच झालेल्या ओळखीत विश्वास ठेऊ नका .काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. दानधर्म नंतर आधी आपला स्वार्थ साधून घेणे गगरजेचे. 

 • वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ४

नोकरदारांनी आपल्या वाटयाचे काम प्रामाणिकपणे करावे. हातचे सोडून पळत्यामागे जाणे योग्य ठरणार नाही. रूग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसेल.

 • मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : २

आज कौटुंबिक पातळीवर काही उत्साहवर्धक  घटना घडतील. गृहीणींचे गृहोद्योग तेजीत चालतील. प्रेमप्रकरणे  मात्र डोक्याला ताप देतील. दूरच रहा.

 • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

कार्यक्षेत्रात उद्धीष्टे पूर्ण करायची असतील तर कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. आज महत्वाच्या काही  घरगुती कामांकडे तुमचे दुर्लक्ष होणार आहे. 

 • सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

धंद्यात आवक मनाजोगी राहील. घरगुती जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. महत्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.

 • कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत. 

 • तूळ: शुभ रंग : अबोली | अंक : ६

टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. डोळ्यांची निगा राखा.

 • वृश्चिक : शुभ रंग : नांरिंगी | अंक : ९

जिवलग  मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहीक जिवनात गोडवा राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता.

 • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८

नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागणार आहे.वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. 

 • मकर : शुभ रंग : भगवा| अंक : १

नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.    

 • कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ७

नवीनच झालेल्या  ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.

 • मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : ९

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

बातम्या आणखी आहेत...