Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

रिलिजन डेस्क | Update - May 15, 2019, 12:15 AM IST

बुधवार राशिफळ : अशुभ योगामध्ये दिवसाची सुरुवात होत असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांना होऊ शकते धनहानी, इतर सहा राशीच्या लोकांसाठी खास राहील दिवस

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  बुधवार 15 मे रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. जवळपास दिवसभर राहणारा हा योग काही लोकांसाठी कष्टाचा ठरेल. धनहानी होऊ शकते. अशुभ योग जुळून येत असल्यामुळे मतभेद किंवा वाद होऊ शकतात. काही राशीचे लोक महत्त्वाच्या कामामध्ये चुकीचे निर्णय घेऊ शकतात. कामात मन लागणार नाही. बुधवारची ग्रहस्थिती ठीक नसल्यामुळे बहुतांश लोक त्रस्त राहतील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  कर्क :  शुभ रंग : मोतिया | अंक : ४
  काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही करकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. अाज कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : १
  उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने आज नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांचा सहवास लाभेल.    

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  धनू :  शुभ रंग : भगवा | अंक : ७
  कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.  

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  मेष: शुभ रंग : आकाश् | अंक : ३ 
  अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका. 

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : २ 
  धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहता येईल.  

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  वृषभ: शुभ रंग: राखाडी | अंक : ५                                     प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील.   

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५ 
  आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
  बेरोजगारांनी रोजगारासाठी  दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर  राहील. 

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ८           
  प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस. 

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
  कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस. 

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : नारिंगी | अंक : ६
  आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

 • wednesday 15 may 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
  आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. सगळयाच गोष्टी आपल्याच मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नको. 

Trending