आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

सिद्धी योगामध्ये दिवसाची सुरुवात या 7 राशीच्या लोकांना होऊ शकते एक्स्ट्रॉ इन्कम

रिलिजन डेस्क

Oct 16,2019 12:10:00 AM IST

बुधवार 16 ऑक्टोबरला भरणी नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार....



मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. एखादी क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.



वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ४
हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क ला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. अती काबाड कष्ट तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात असूद्या.



मिथुन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ९
राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. व्यवसायाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. विवाहेच्छूकांचे एखाद्या समारंभात सूत जुळू शकेल.



कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : १
अधिकारी वर्गाकडून त्रास संभवतो. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. मित्रांच्या फार नादी लागूच नका.



सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
नोकरीच्या ठीकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. घरात थोर मंडळीही आपल्याच मतावर अडून बसतील. आज एकांत हवासा वाटेल.



कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ७
उद्योग व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरीत साहेबांचे समाधान होणे केवळ अशक्य. आज जोडीदारही माझेच खरे म्हणेल. संयमाची गरज आहे.



तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३
तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल. तुमच्यातील नेतृत्वगुणांस वाव मिळेल.जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.



वृश्चिक : शुभ रंग : अबोली| अंक : १
आजचा दिवस फक्त कर्म करण्याचा. फळ उशिराने का होईना मिळणारच आहे. हितशत्रू सक्रिय असताना भावी उपक्रम आत्ताच उघड करू नका. तंदुरुस्ती महत्वाची.



धनू : शुभ रंग : पिवळा| अंक : ५
सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, मुलांची खेळणी वगैरे व्यवसाय तेजीत चालतील. कलाक्रिडा क्षेत्रातल्या मंडळींना उत्तम संधी मिळतील. हौसमौज कराल.



मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : २
आज तुमचे मनोबल चांगले असेल. आत्मविश्वास वाढवणाऱी घटना घडेल. मुलांची शिक्षणातील प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांनी प्रयत्न वाढवावेत.



कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
महत्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. हाती असलेले पैसे जपून वापरा. आनंदाच्या भरात कुणाला वचने देऊ नका.



मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दूरावलेले नातलग जवळ येतील. आज पैसा पुरेसा असल्याने मनासारखा खर्च करता येतील. आज आनंदी दिवस.

X
COMMENT