आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार 

Rashifal today: आज चंद्र मिथुन राशीमध्ये करणार प्रवेश, शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, संध्याकाळी सुरु होणार व्याघात नावाचा अशुभ योग

रिलिजन डेस्क

Apr 17,2019 12:00:00 AM IST

बुधवार, 17 एप्रिलला त्रयोदशी तिथी आणि ध्रुव योगाचा संयोग राहील. दिवसभर शुभ योग असल्यामुळे संध्याकाळी 6 पासून व्याघात नावाचा अशुभ योग सुरु होता आहे. चंद्र सकाळी 7 वाजून 17 मिनिटांपर्यंत सिंह राशीमध्ये राहील आणि त्यानंतर बुधची राशी कन्यामध्ये प्रवेश करेल. चंद्राच्या रशिपरिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. इतर पाच राशीच्या लोकासांठी संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : ध्येयप्राप्तीसाठी अविश्रांत काम करण्याची तुमची तयारी असेल. तरीही आज कामाचे दडपण जाणवेल. तब्येतीची हेळसांड नको. शुभ रंग: जांभळा| अंक:३वृषभ : व्यवसायात अनपेक्षित पैसा येईल. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. वडीलधाऱ्यांना कौतुकास्पद वाटणारी कामगिरी तुमच्याकडून होईल. संततीकडून सुवार्ता. शुभ रंग : तांबडा|अंक : ८मिथुन : आज गृहसौख्याचा दिवस. नोकरदारांना कामावर दांडी मारायचा मूड राहील. आज सहकुटुंब सहलीस, करमणुकीस प्राधान्य द्याल. मुलांचे हट्ट पुरवाल. शुभ रंग : क्रिम| अंक : १कर्क : आज जास्त वेळ घराबाहेरच जाईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बरीच धावपळ होणार आहे.कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३सिंह : आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल. शुभ रंग : पांढरा | अंक : २कन्या : व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्त्वांना मुरड घालावी लागेल. शुभ रंग : चंदेरी | अंक : १तूळ : बेरोजगारांना घरापासून लांब रोजगाराच्या संधी येतील. उच्चशिक्षित असाल तर विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च मात्र आवाक्याबाहेर जाणार आहे. शुभ रंग : गुलाबी | अंक : ४वृश्चिक : तुमच्यावर मित्रमंडळींचा प्रभाव राहील. आपला मोठेपणा जपण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. शुभ रंग : केशरी | अंक : ५धनू : व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठ्या लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या. शुभ रंग : राखाडी | अंक : ६मकर : नोकरीत उच्च्पदस्थ असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून राहावे. शुभ रंग : आकाशी | अंक : ९कुंभ : थोडेफार नैराश्य जाणवेल. क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनसला लावून घ्याल. भिडस्तपणामुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील. शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८मीन : ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, आज पत्नीचा सल्ला डावलू नका. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७

मेष : ध्येयप्राप्तीसाठी अविश्रांत काम करण्याची तुमची तयारी असेल. तरीही आज कामाचे दडपण जाणवेल. तब्येतीची हेळसांड नको. शुभ रंग: जांभळा| अंक:३

वृषभ : व्यवसायात अनपेक्षित पैसा येईल. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. वडीलधाऱ्यांना कौतुकास्पद वाटणारी कामगिरी तुमच्याकडून होईल. संततीकडून सुवार्ता. शुभ रंग : तांबडा|अंक : ८

मिथुन : आज गृहसौख्याचा दिवस. नोकरदारांना कामावर दांडी मारायचा मूड राहील. आज सहकुटुंब सहलीस, करमणुकीस प्राधान्य द्याल. मुलांचे हट्ट पुरवाल. शुभ रंग : क्रिम| अंक : १

कर्क : आज जास्त वेळ घराबाहेरच जाईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बरीच धावपळ होणार आहे.कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३

सिंह : आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल. शुभ रंग : पांढरा | अंक : २

कन्या : व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्त्वांना मुरड घालावी लागेल. शुभ रंग : चंदेरी | अंक : १

तूळ : बेरोजगारांना घरापासून लांब रोजगाराच्या संधी येतील. उच्चशिक्षित असाल तर विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च मात्र आवाक्याबाहेर जाणार आहे. शुभ रंग : गुलाबी | अंक : ४

वृश्चिक : तुमच्यावर मित्रमंडळींचा प्रभाव राहील. आपला मोठेपणा जपण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. शुभ रंग : केशरी | अंक : ५

धनू : व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठ्या लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या. शुभ रंग : राखाडी | अंक : ६

मकर : नोकरीत उच्च्पदस्थ असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून राहावे. शुभ रंग : आकाशी | अंक : ९

कुंभ : थोडेफार नैराश्य जाणवेल. क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनसला लावून घ्याल. भिडस्तपणामुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील. शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

मीन : ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, आज पत्नीचा सल्ला डावलू नका. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७
X
COMMENT