Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

रिलिजन डेस्क, | Update - Jul 17, 2019, 12:25 AM IST

12 पैकी 6 राशीच्या लोकांवर आज राहील विष्कुंभ नावाच्या अशुभ योगाचा प्रभाव, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  बुधवार 17 जुलै रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती विष्कुंभ नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  मेष : शुभ रंग : लाल | अंक : ८
  आज तुम्ही विचारांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. काही जुनी तत्व गुंडाळून ठेवून लवचिक धोरण स्विकाराल.आज अनावश्यक बोलण्यावर ताबा ठेवाल तर बरे.

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : शुभ रंग : क्रिम | अंक : ५
  आज सहजच काही साध्य होईल या भ्रमात राहू नका. सरकारी कामात विलंब ठरलेलाच आहे. घरात वडीलधाऱ्यांचेही मूड सांभाळावे लागतील.

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : केशरी | अंक : ७        
  आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टहास टाळा. वैवाहीक जिवनांत चालंलंय ते बरं चालंलंय. जोडीदाराच्या चुका काढण्याचा प्रयत्न नको.

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६                                                             
  अत्यंत उत्साही व आनंदी दिवस. तुमच्या महत्वाकांक्षा व अपेक्षाही वाढतील. आज एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. गृहलक्ष्मी हसतमुख राहील.

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : डाळींबी | अंक : २                                                             
  नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वृध्दी होईल. तुम्ही जीव ओतून काम कराल. रिकामटेकड्या वादविवादात मात्र आज तटस्थ रहा. मित्रांना उद्याच यायला सांगा. 

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४                                                                          
  तुमच्या प्रभावी वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर प्रभाव पडेल. आज तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
  फक्त कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. मातोश्रींकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे फाजिल लाड बंद करावे लागतील. 

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
  घराबाहेर वावरताना तापट स्वभाव काबूत ठेवावा.आपली मते इतरांवर लादून चालणार नाहीत. अती दगदग, धावपळ झाल्याने प्रकृती जरा नरमच राहील.

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : २            
  पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. नवे हितसंबंध जोडले जातील.  दिवस अनुकूल असल्याने आजचे काम उद्यावर ढकलू नका.    

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३                                                                          
  व्यवसायात तीव्र स्पर्धा जाणवेल. सम व्यावसायिक मंडळींना कमजोर समजू नका. काही नवे डावपेच लढवावे लागतील. अविश्रांत श्रम गरजेचे आहेत. 

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ५                                                                           
  आजच झालेल्या नव्या ओळखींवर चुकूनही विश्वास ठेऊ नका. हाती असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे. रात्रीच्या प्रवसात सतर्क रहावे. मौल्यवान सांभाळा.  

 • wednesday 17 july 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
  बऱ्याच दिवसांपासूनची काही अपूरी स्वप्ने साकार होऊ शकतील. कर्जप्रस्ताव मंजूर होतील. आज शुभ चिंता, जे मागाल त्याला देव तथास्तू म्हणणार आहे. 

Trending