आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 20 नोव्हेंबरचे चे ग्रह-तारे आणि नक्षत्र ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर राशींसाठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील...

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ३

नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. रूग्ण ठणठणीत बरे होतील. 

  • वृषभ: शुभ रंग : माेतिया | अंक : ५

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

  • मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहीणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.

  • कर्क : शुभ रंग : नारिंगी | अंक : ७

कितीही वाढता खर्च असला तरी आज पैशाची कमतरता जाणवणार नाही. आज घराबाहेर वावरताना शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवलेले बरे.                                                               

  • सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील. नवविवाहीतांची स्वप्ने साकार होतील. छान दिवस. 

  • कन्या : शुभ रंग : पोपटी | अंक : ८

व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेनेे जरासे नैराश्य येईल. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे केलेले बरे.  

  • तूळ : शुभ रंग : अबोली | अंक : ६

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. काही दूरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.   

  • वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नपूर्तीसाठी कामाचे तास वाढवाल.                                                                                   

  • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल. 

  • मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ३

आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रीय असल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यावा. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल.       

  • कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : २

घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव  राहील. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

  • मीन : शुभ रंग : पिवळा | अंक : ४

आज तुम्हाला काही मान अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही आज काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील. 

बातम्या आणखी आहेत...