आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

बुधवार 25 डिसेंबरला ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. या योगचा अशुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. बुधवारच्या या अशुभ योगामुळे 7 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : १

कार्यक्षेत्रातील मनाविरुध्द घटना तुम्हाला अस्वस्थ करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच.

  • वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका.

  • मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा.

  • कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ६

सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस.                                                                    

  • सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ७

आर्थिक आवक पुरेशी असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. मुले आज्ञा पाळतील.

  • कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

कंटाळवाणा दिवस. क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींना आज शेजारधर्म जपावा लागेल. 

  • तूळ: शुभ रंग : चंदेरी | अंक : ९

आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे. 

  • वृश्चिक : शुभ रंग : मरून | अंक : ६

आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल.

  • धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : २

नवीन व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच उलाढाली केराव्यात. अती आक्रमकतेने निराशा पदरी पडेल. थोर मंडळींचे  अनुभवाचे बोल ऐकून घेणे हिताचे.

  • मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ८

आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल.

  • कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील. 

  • मीन : शुभ रंग : साेनेरी | अंक : २

नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...