आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 4 डिसेंबर रोजी शतभिषा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : १

आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल. 

  • वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर महागात पडू शकेल. सामंजस्याचे धोरण हिताचे. 

  • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ९

नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील. 

  • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : १

कार्यक्षेत्रातील काही मनाविरुध्द घटना तुम्हाला बेचैन करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच.

  • सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : २

व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका. 

  • कन्या : शुभ रंग : माेरपंखी | अंक : ४

वादविवादात आज  स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा.                 

  • तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ३

सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस.

  • वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ५

आवक पुरेशी असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. आज मुले आज्ञेत राहतील.

  • धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ८

आज काही दैनंदीन क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींना शेजारधर्म जपावा लागणार आहे. 

  • मकर : शुभ रंग : निळा | अंक : ६

आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे.

  • कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

आज स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल.  

  • मीन : शुभ रंग : मरून | अंक : ७

व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. थोरांचे अनुभवाचे बोल ऐकून घ्यावेत. अती आक्रमकतेने निराशाच पदरी पडेल.  

बातम्या आणखी आहेत...